शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

मनरेगाच्या कामाचा थकीत निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

सर्व गटविकास अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांचा निधी सात दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा, त्यानंतरच नवीन कामांची मागणी केली जाईल. या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देसरपंच सेवासंघाची मागणी : जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील ग्रामपंचायतस्तरावर झालेल्या विकास कामातील कुशल कामाचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने इतर विकास कामात अडथळा निर्माण होत आहे. तरी शासनाने ग्रामपंचायत स्तरावरील साहित्य पुरवठ्याचा सर्व निधी त्वरीत उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर ग्रामपंचायत स्तरावर बहिष्कार टाकणार असा ईशारा जिल्हा सरपंच सेवा महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे आणि जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदनात, सरपंच सेवा संघाने सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये मनरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर रस्ते, तलाव खोलीकरण, पाईप पूल, वनतलाव, नाला सरळीकरण अशी अनेक प्रकारची विकास कामे करण्यात आली. या कामांमधील कुशल कामांकरिता लागणाऱ्या साहित्य पुरवठ्याची ऑनलाईन निविदा काढून त्यात अटी व शर्ती प्रमाणे निविदा मागवून पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतस्तरावर सारख्याच प्रकारे करण्यात आली होती. या सर्व कामांना दोन वर्षांचा कालावधी लोटूनही आणि वारंवार या कामांची चौकशी होऊन सुद्धा या कुशल कामांचा निधी अद्याप उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.या बाबतीत सर्व गटविकास अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांचा निधी सात दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा, त्यानंतरच नवीन कामांची मागणी केली जाईल. या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शिष्टमंडळात सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कमल येरणे, सरचिटणीस नितीन टेंभरे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, गंगाधर परशुरामकर, जिल्हा समन्वयक नरेंद्र शिवणकर, आमगाव तालुका सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष सुनील ब्राम्हणकर, सरपंच सुनंदा उके, शोभा मेश्राम, अनिता आगरे, भारती येडे, सुनिता तुरकर, रामेश्वर शेंडे यांचा समावेश होता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत