शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्हा डासमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 22:03 IST

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.

ठळक मुद्देरमेश अंबुले : जागतिक हिवताप दिनानिमित्त अधिकारी-कर्मचारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले.जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात बुधवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते मार्गदर्शन करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प.महिला व बालकल्याण समितीचे सभापती लतादोनोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत, एच.एच.पारधी यांची उपस्थिती होती.मलेरियासारख्या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने दक्ष राहावे, असे सांगून अंबुले म्हणाले, सांडपाणी रस्त्याने वाहणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. ज्यांनी मलेरीया निर्मूलनासाठी चांगले काम केले आहे ते कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.दोनोडे म्हणाल्या, आरोग्य चांगले राहावे यासाठी शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना आहेत. प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. डासांची उत्पत्तीच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य विभागाने ज्या गावामध्ये डास आहेत तेथे नियमित फवारणी करावी. त्यामुळे मलेरियासारखे आजार होणार नाही, असे त्यांनी सांगितले.पातुरकर म्हणाले, कुटूंब कल्याण व मलेरिया निर्मूलन कार्यक्रम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. नियोजनात चुका झाल्या की रूग्णांच्या प्रमाणात वाढ होते. आरोग्य सेवा झपाट्याने या रोगावर मात करण्यासाठी काम करीत आहे. कायाकल्प योजना व लोकसहभागातून आरोग्य विभाग मलेरिया या आजारावर मात करण्यासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. निमगडे म्हणाले, हिवताप हा आजार राज्याच्या काही भागात आहे. गोंदिया व गडचिरोली हे जिल्हे मोठ्या प्रमाणात जंगलव्याप्त असल्यामुळे आणि शेजारी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून असल्यामुळे कामानिमित्त स्थलांतर करणाºयांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: जिल्ह्यातील देवरी व सालेकसा तालुक्यात या आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. मलेरियाच्या डासापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे सुध्दा या भागात वितरण करण्यात आले आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन केले तर डासांची उत्पत्ती होणार नाही व या आजारावर मात करता येईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.वाळके म्हणाले, मच्छरांपासून हा आजार होतो. मलेरियामुळे विकासात अडथळा निर्माण झाला आहे. या आजारावर मात करण्यासाठी आबालवृध्दांना आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी मांडले. संचालन किशोर भालेराव यांनी केले. आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा येळे यांनी मानले. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, आशा सेविका यांची उपस्थिती होती.उत्कृष्ट कार्याची दखलमलेरियाच्या निर्मूलनासाठी उत्कृष्ट कार्य करणारे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ओ.जी. थोटे, डॉ. नरेश येरणे, मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विजय पटले, ककोडीचे डॉ. गजानन काळे, केशोरीचे डॉ. पिंकू मंडल, धाबेपवनीचे डॉ.ए.बी. हजारे, खोडशिवनीचे डॉ. खोटेले, शेंडाचे डॉ. डुंभरे, तसेच प्रत्येक तालुक्यातील तीन आशा कार्यकर्ती, एक़ आरोग्य सहायक, एक आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक व एक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांचा व काही पत्रकारांचा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Healthआरोग्य