शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जिल्ह्यात ८५ टक्के रोवणी आटोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

जून महिन्यात पावसाला सुरूवात होऊन शेतीची कामेही मोठ्या झपाट्याने सुरू होतात. मात्र जून महिना कोरडाच गेला व त्यामुळे शेतीची कामेही पूर्णपणे ठप्प पडून होती. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामात हात टाकला. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी बघतच बसले.

ठळक मुद्देयंदा झाला उशीर : काही दिवसांत उर्वरित रोवण्या आटोपण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाच्या खेळीमुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांवर चांगलाच परिणाम दिसून आला. मात्र उशिरा का होईना जिल्ह्यात आता ८५ टक्के रोवणी आटोपली आहे. त्यातही सध्या पावसाची दररोजच हजेरी लागत असल्याने काही दिवसांतच उरलेली १५ टक्के रोवणी आटोपणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जात असून धान हेच जिल्ह्यातील मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता अन्य पिक ांकडे वळत असल्याचे दिसून येत असतानाही सर्वात जास्त प्रमाणात धान शेतीच केली जाते. धानाला जास्त पाणी लागत असल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत राहतो. त्यातही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती पिकवीत आहे. त्यामुळे पाऊस आल्यावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलते व शेतीची कामे वेगाने सुरू होऊन तेवढ्याच वेगाने आटोपती करतात.यंदा मात्र सुरूवातीपासून पावसाने आपला रंग दाखविला. जून महिन्यात पावसाला सुरूवात होऊन शेतीची कामेही मोठ्या झपाट्याने सुरू होतात. मात्र जून महिना कोरडाच गेला व त्यामुळे शेतीची कामेही पूर्णपणे ठप्प पडून होती. पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांची शेतीच्या कामात हात टाकला. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेले शेतकरी बघतच बसले. त्यानंतर जुलै व आता आॅगस्ट महिन्यात काही प्रमाणात पावसाने शेतकºयांना साथ दिली व शेतकरी कंबर कसून शेतीच्या कामाला लागला. जुलै महिन्यातील पावसाने शेतीची कामे जोमात सुरू झाली व आॅगस्ट महिन्यातील दमदार पावसाने रोवणीच्या कामांना वेग आला.यातून जिल्ह्यात सध्या ८५ टक्के रोवणीची कामे आटोपल्याची माहिती कृषी विभागाने दिली.यंदा एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर सर्व साधारण धानाचे क्षेत्र असून त्यातील एक लाख ६७ हजार ९५८.२५ हेक्टरमध्ये रोवणी व आवत्या आटोपल्या आहेत. त्यामुळे आता फक्त १५ टक्के क्षेत्र उरले असून पाऊस सध्या दररोज बरसत असल्याने काही दिवसांत या उरलेल्या रोवण्याही आटोपणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.गोंदिया तालुक्यात सर्वाधिक धान क्षेत्रजिल्ह्यात एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर धानाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा मात्र एक लाख ६७ हजार ९५८.२५ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक पेरणी करण्यात आली आहे. तालुकानिहाय पाहणी केल्यास गोंदिया तालुक्यात ४५ हजार ८१० सर्वसाधारण क्षेत्रातील ३४ हजार १६७ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे. गोरेगावतालुक्यात २१ हजार १७० हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ४२६ हेक्टरमध्ये, तिरोडा तालुक्यात ३० हजार ४१६ हेक्टर क्षेत्रातील २४ हजार ७१३ हेक्टरमध्ये, सडक-अर्जुनी तालुक्यात १८ हजार १७२ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ५८०.६० हेक्टरमध्ये, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २२ हजार २५५ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ५८०.६० हेक्टरमध्ये, आमगाव तालुक्यात १९ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रातील १७ हजार ४४६.५० हेक्टर क्षेत्रात, सालेकसा तालुक्यात १७ हजार ७६९ हेक्टर क्षेत्रातील १५ हजार ६६.१५ हेक्टरमध्ये तर देवरी तालुक्यातील २२ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रातील २० हजार २११ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती