नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:13+5:30

कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे होते. या वेळी लेट्स टीच वन मुंबई या संस्थेचे प्रतिनिधी दीपेश टॅँक, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे, आश्रमशाळेचे प्राचार्य राऊत, मेहताखेडाचे सरपंच महाराज सलामे, इस्तारीचे सरपंच राजकुमार अठभैया, चिचगडचे ठाणेदार अतुल तावाडे उपस्थित होते.

Distribution of bicycles to students of Naxal affected areas | नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

Next
ठळक मुद्देपोलीस विभागाचा उपक्रम : विद्यार्थिनीच्या अभ्यासातील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
चिचगड : गोंदिया जिल्हा पोलीस आणि लेट्स टीच वन मुंबई या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील कडीकसा शासकीय आश्रम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी गोंदियाचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे होते. या वेळी लेट्स टीच वन मुंबई या संस्थेचे प्रतिनिधी दीपेश टॅँक, देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललित कुकडे, आश्रमशाळेचे प्राचार्य राऊत, मेहताखेडाचे सरपंच महाराज सलामे, इस्तारीचे सरपंच राजकुमार अठभैया, चिचगडचे ठाणेदार अतुल तावाडे उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. कुलकर्णी म्हणाले, आश्रमशाळेत दूर अंतरावरून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. या विद्यार्थ्यांचा बराच वेळ संसाधनाभावी प्रवास करण्यात जातो. यामुळे याचा गोष्टीचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. त्यांचा हा वाया जाणारा वेळ त्यांच्या अभ्यासासाठी कामी पडावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने या गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला. ज्या विद्यार्थिनींना आता सायकल मिळाली आहे. अशा विद्यार्थ्यांसह इतरांनी सुद्धा आपला वेळ अभ्यास व व्यक्तिमत्व विकासासाठी खर्ची घालून देशाची सेवा करण्याची जिद्द मनात बाळगावी, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. गणुटोला येथील धनिराम फागू मडावी याला गणुटोलाच्या सशस्त्र दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी यांनी मदत करून कृत्रिम हात बसविण्यासाठी मदत केली. या कर्मचाऱ्यांचा कुलकर्णी यांचे हस्ते शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील येळमागोंदी येथे एका ग्रामसभेचे आयोजन करून परिसरातील येळमागोंदी, गुजुरबळगा, मांगाटोला, धमदीटोला येथील नागरिकांना मोटार वाहन परवाना काढून देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पोलीस विभागाच्या सहकार्याने ६० नागरिकांना वाहन परवान्यांचे वाटपही करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक जमादार यांनी केले. आभार जगदाळे यांनी मानले. या वेळी चिचगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, गणुटोला पोलीस दलाचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Distribution of bicycles to students of Naxal affected areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.