शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांना माक्स व साबण वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन सजग राहण्यासंबंधी जनजागृती केली जात आहे. गावात सर्वत्र स्वच्छता राहावी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवणकाम करणाऱ्यांना काम : साहित्यांचे घरपोच वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : कोरोना या संसर्गजन्य विषाणूवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतच्यावतीने गावकºयांत जनजागृती करुन सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. ‘गड्या आपले गाव सांभाळा’ या वचनपूर्तीची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तसेच जि. प. सदस्य कमल पाऊलझगडे यांच्या संयुक्तवतीने गावकरी तसेच शासकीय तथा निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी व हितचिंतकांना कापडी मास्क व साबणाचे घरपोच वाटप करण्यात आले.सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वांना घरात राहण्याची सक्ती आहे. संचारबंदीमुळे गावातील सर्व हालचालींवर बंदी आली. जिवघेण्या कोरोनापासून गावकऱ्यांचे रक्षण व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने खबरदारी घेऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या सूचना देऊन सजग राहण्यासंबंधी जनजागृती केली जात आहे. गावात सर्वत्र स्वच्छता राहावी म्हणून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. गावातील मुख्य चौकात दुकानांसमोर गर्दीचे दिसू नये म्हणून कोरोना आपातकालीन गाव समितीची नियुक्ती करुन संपूर्ण गावकºयांना जीवघेण्या विषाणूपासून सावध रहा असे समितीकडून सांगण्यात येते. गावातील जे कोणी शहराच्या ठिकाणाहून आले त्यांना शिक्का मारुन होम क्वारंटाईन करण्यात आले. मंगळवारी भरणाºया आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली.ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामपंचायत व जि.प.सदस्य पाऊलझगडे यांच्यावतीने सर्व ग्रामस्थांना कापडी माक्स व साबणाचे वाटप करण्यात आले.यासाठी ६ पथक बनविण्यात आले आहे.माक्स व साबण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच राधेशाम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, ग्रा. पं.सदस्य अमरचंद ठवरे, राकेश लंजे, साधू मेश्राम, विठ्ठल झोळे, रंजना बोरकर, दिपीका गजभिये, मिनाक्षी झोळे, किरण शेंद्रे, तंमुस अध्यक्ष श्रीकांत बनपूरकर, रत्नाकर बोरकर, रवि बनपूरकर, बाळू पर्वते, कुकसू मेश्राम, पुस्तकला बरय्या, कैलाश धावडे, राष्ट्रपाल ठवरे, किशोर शहारे, गुड्डू मेश्राम, दिपक तिपातले आदिनी सहकार्य केले.गावकºयांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती केली जात आहे. ग्रामविकास अधिकारी पी. एम. समरीत गावातील हालचालींवर लक्ष ठेवून या परिस्थितीत गरजूंना त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहे.अनेकांना मिळाले कामकापडी माक्स गावातच बनविण्यात आले. घरी शिवणकाम करणाऱ्या महिला व पुरुषांकडून कापडी माक्स तयार करण्यात आले. २ हजार माक्स गावातील कारागिरांनी तयार केल्यामुळे ‘लॉकडाऊन’ स्थितीत त्यांना रोजगार मिळाला. गावातील २५ महिला-पुरुषांनी माक्स बनविण्याच्या कामात योगदान दिले. शिवणकाम करणाºया प्रत्येकांना प्रती माक्स ३ रुपये प्रमाणे मोबदला देण्यात येणार असल्याचे समरीत यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक