या चर्चेत शिक्षकांची रिक्त पदे भरणे, कोरोनामुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण बंद करणे, सेवानिवृत्तांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता देणे, ३० जूनला निवृत्त होणाऱ्यांना जुलैची वेतन वाढ देणे, प्लानमधील शाळेतील शिक्षकांना दरमहा वेतन मिळणे, तीन टक्के महागाई भत्त्याची थकबाकी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देणे, यासह संत ज्ञानेश्वर विद्यालय दतोरा शाळेतील शिक्षकांच्या वैयक्तिक समस्यांवर चर्चा झाली. समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात आले. वेतन पथक व भनिनि कार्यालयाचे अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे उपस्थित होते. काही शासन स्तरावरील समस्याकरिता विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. सहविचार सभेत भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी अरुण पारधी, लिलेश्वर बोरकर, लक्ष्मण आंधळे, सनत मुरकुटे, सतीश मंत्री, चरणदास डहारे, मनोज येळे उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी व शिक्षक आघाडी यांच्यात चर्चा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST