शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

जीर्ण इमारती बनल्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:38 PM

मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला.जीर्ण इमारतींमुळे घडलेल्या या घटनांनी नागरिकांचे नाहक बळी जात असताना गोंदिया नगर परिषदेलाही अशाच अपघातांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देनगर परिषदेला अपघातांची प्रतीक्षा : फक्त नोटीस बजावून हातवर

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला.जीर्ण इमारतींमुळे घडलेल्या या घटनांनी नागरिकांचे नाहक बळी जात असताना गोंदिया नगर परिषदेलाही अशाच अपघातांची प्रतीक्षा असल्याचे दिसून येते. शहरात १३७ इमारती जीर्ण असल्याची आकडेवारी असताना मात्र नगर परिषद त्यांना केवळ नोटीस बजावून मोकळी झाली आहे. मात्र या इमारतींचे पुढे काय याबाबत कुणीही काहीच बोलायला तयार नाही.जीर्ण इमारती पडून जिवीतहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. अशा घटना पावसाळ््यात जास्त प्रमाणात घडतात.शहरातही असे काहीसे प्रकार घडले आहेत. असे प्रकार घडू नये व जीर्ण इमारती पडून कुणाचा जीव जाऊ नये याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर असते. नगर परिषदेला यासाठी विभाग निहाय पथक तयार करून जीर्ण इमारतींची माहिती संकलीत करावयाची असते. तसेच अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजाविण्याचे,शिवाय गरज पडल्यास धोकादायक बांधकाम पाडण्याची कारवाई करावी लागते.जीर्ण इमारतींचा हा धोका मुख्यत्वे पावसाळ््यात उद्भवत असल्याने शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.विशेष म्हणजे, नगर परिषदेला याचा चांगलाच अनुभव असून नगर परिषदेचा एक जीर्ण भाग यापूर्वी पडला आहे. यातूनच यंदा नगर परिषदेने कर विभागाकडून शहरातील जीर्ण इमारतींची यादी तयार करवून घेतली.त्यानुसार मोहरीरनी शहरातील १३७ जीर्ण इमारतींची यादी तयार करून नगर रचना विभागाला दिली आहे. या यादीच्या आधारे नगर रचना विभागाने संबंधीत मालमत्ता धारकांना नोटीस बजावले आहे.विशेष म्हणजे, जीर्ण इमारत पडून त्यातून काही धोका निर्माण होत असल्यास नगर परिषद मालमत्ताधारकास नोटीस बजावून त्यांना जीर्ण इमारत पाडण्यास सांगते. त्यांच्याकडून इमारत न पाडल्यास नगर परिषद ती जीर्ण इमारत पाडू शकते अशी अधिनियमांत तरतूद असल्याची माहिती आहे.त्यानुसार, नगर परिषदेने या मालमत्ता धारकांना ३१ मे ते १० जून या कालावधीत नोटीस बजावले आहे. त्यानंतर मात्र आता पुढे काय याबाबत कुणाही काहीच बोलायला तयार नाही.स्ट्रक्चरल आॅडिट झालेच नाहीनगर परिषदेने सन २०१८-१९ या वर्षात १८१ इमारतींच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. तर सन २०१९-२० मध्ये अतापर्यंत ८५ बांधकामांना मंजुरी दिल्याची माहिती आहे. असे असतानाही या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. अशात या इमारती नगर परिषदेला देण्यात आलेल्या नकाशानुसार तयार होत आहेत किंवा नाही दे कळायला मार्ग नाही.शिवाय इमारतींमध्ये अग्निशमन व्यवस्था, पार्कींग यासह अन्य आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात आली की नाही हे सुद्धा नगर परिषदेला माहिती नाही. अशात नियमांना तोडून बांधकाम केले जाणार यात शंका नाही.तरतूद असतानाही कारवाई नाहीजीर्ण इमारतींपासून धोका दिसत असल्यास अशा इमारतींना पाडण्यासाठी नगर रचना विभागाकडून संबंधित मालमत्ताधारकाला नोटीस बजावून त्या इमारतीला पाडणे किंवा सुरक्षीत करण्यास सांगीतले जाते. संबंधितांकडून जर काहीच केले जात नसल्यास अशा इमारतींना नगर परिषद पाडून संबंधितांकडून झालेला खर्च वसुल करू शकते अशी तरतूद आहे.येथे मात्र नगर रचना विभागाकडून नोटीस बजावून धन्यता मानली जाते. पुढे काहीच कारवाई केली जात नसल्याने ही धोकादायक बाब ठरत आहे.नगर परिषदेची भूमिकागोंदिया शहरात नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात १३७ इमारती जीर्ण झाल्याचे आढळले. संबंधित इमारत मालकांना जीर्ण बांधकाम पाडण्याची नोटीस बजाविली आहे. नोटीसनंतरही स्वत:हून इमारत न पाडल्यास नगर परिषद अंतर्गत जीर्ण इमारती पाडण्यात येतील.- चंदन पाटील, मुख्याधिकारी