शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

धम्मगिरी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे केंद्र ठरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:23 PM

संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : आंतरराज्यीय धम्मसंमेलन परिचर्चा व समारोप कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे. अशा धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने धम्मगिरी या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले.बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी त्रिपाठक या पाली भाषेतील ग्रंथाचे भाषांतर कार्य राज्य शासनाने सुरु केले आहे. तेव्हा धम्मगिरी हे बौद्ध धम्माच्या प्रसाराचे एक सांस्कृतिक केंद्र ठरावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलन धम्मपरिचर्चा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ती म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे अशोक सरस्वती होते. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रा.घनश्याम धाबर्डे, बनवणे, तनूजा झिलपे, दिल्लीचे सुनील रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, आर.एन. रावते, मनोहर कोटांगले, भरत वाघमारे, ललीतकुमार खोब्रागडे, बी.जी. बुलाखे, फटिंग आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरस्वती यांनी, बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म असून त्याचा प्रसार व प्रचार नि:स्वार्थ भावनेतून करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक संघटनांद्वारे होत असलेले कार्य पूर्ण संघटनांच्या समन्वयातून केल्यास मजबूत व यशस्वी संघटन निर्माण करता येईल असे मत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे डॉ. मोहनलाल पाटील, रेशम भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, यादव मेश्राम, पंचायत समिती सभापती वंदना बोरकर, पंचायत समिती सदस्य छबू उके आदी उपस्थित होते.पालकमंत्री व वाहने दाम्पत्याचा सत्कारया कार्यक्रमात समितीच्यावतीने नामदार राजकुमार बडोले यांचा स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गोंदियाचा जतिन वहाणे रशियात वास्तव्यास असलेला जगातील पहिला कनिष्ठ वैज्ञानीत ठरला. याबद्दल त्याच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.