शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:46 PM

गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची मागणी : दुपारी पाळीत रेल्वे गाडी सुरू करा,रेल्वेला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगढ येथे प्रसिद्ध बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे.या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर, डोंगरगढ व डोंगरगढ-चंद्रपूर (बल्लारशाह) रेल्वेगाडी चालविण्यात यावी.जेणेकरुन महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविकांंना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते.काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत रेल्वेगाडी नसल्याने गोरेगाव, सडक अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दरेकसा परिसरातील नागरिकांची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डोंगरगढ व बल्लारशाह मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची गैरसोयबाहेर गावावरुन सकाळी गोंदियाला आलेल्या नागरिकांना दुपारच्या पाळीत गाडीच नसल्यामुळे सायंकाळी शिवाय स्वत:च्या गावाला परत जाता येत नाही. या मार्गावर दळण-वळणाची साधने नसल्याने दरेकसा, जमाकुडो, विचारपूर, चांदसुरज या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या दोन्ही मार्गावर दुपार पाळीत लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने गोंदियाला आलेल्या नागरिकांना सायंकाळच्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. रेल्वे प्रवाशांच्या उदासीनतेमुळे गोंदिया-डोंगरगढ व गोंदिया-वडसा दरम्यान लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वेळेचा अपव्यय ही होत आहे.