शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

मागणी १४० रुपयांची, मंजूर केले केवळ ४० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:59 IST

Gondia : धान भरडाई दरात वाढ राईस मिलर्समध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासकीय धान भरडाईच्या दरात शासनाने ४० रुपये वाढ करण्याचा निर्णय सोमवारी (दि.२३) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. मात्र, या निर्णयामुळे राईस मिलर्समध्ये नाराजीचा सूर आहे. राईस मिलर्सने १४० प्रतिक्विंटल भरडाई दर देण्याची मागणी केली होती, पण शासनाने केवळ ४० रु. दरात वाढ केल्याने धानाची भरडाई करायची कशीश, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते. 

यानंतर धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून धानाची भरडाई करून सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. राईस मिलर्सला प्रति १ क्विंटल धानामागे भरडाई करून ६७ क्विंटल तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो, तर १ क्विंटल धानाच्या भरडाईसाठी ५० रुपये खर्च येतो, पण भरडाईदरम्यान तांदळाचा तुकडा कमी येतो. 

त्यामुळे तांद‌ळाची उतारी ही ५० ते ५५ किलोच्यावर जात नाही. परिणामी, राईस मिलर्सला नुकसान सहन करावे लागते. त्यामुळेच राईस मिलर्सकडून धानाच्या प्रतिक्विंटल भरडाईचे दर १४० रुपये देण्याची मागणी केली जात होती. तसेच १४० रुपये दर का हेसुद्धा राईस मिलर्सने शासनाकडे पत्रव्यवहार करून पटवून दिले होते. मात्र, यानंतरही शासनाने सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ ४० रुपये वाढ केली. 

त्यामुळे आता राईस मिलर्सला प्रतिक्विंटलमागे भरडाईसाठी ५० रुपये मिळणार आहे. मात्र, यानंतर राईस मिलर्सला नुकसान होणार असल्याने या निर्णयाने राईस मिलर्समध्ये नाराजीचा सूर आहे. 

११ वर्षांपासून भरडाई दरात वाढीची मागणी लगतच्या मध्य प्रदेशात शासकीय धानाचा प्रतिविचटल भरडाईचा दर २०० रुपये, तर छत्तीसगडमध्ये १३० रुपये प्रतिक्चिंटल आहे. मात्र, केवळ महारा- ष्ट्रातच प्रतिक्चिटल भरडाईचा दर ५० रुपये दिला जातो. या दरात वाढ करण्यात यावी यासाठी राईस मिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, पण शासनाने अद्यापही १४० रुपये प्रतिक्विंटल दर दिला नाही.

त्यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर परिणाम भरडाईदरम्यान तांदळाची उतारी ५० ते ५५ किलो येत आहे, तर शासनाला प्रतिक्विंटलमागे ६७ क्विंटल तांदूळ जमा करावे लागत आहे. भरडाई दर कमी असल्याने व तूट अधिक असल्याने त्यात बाहेरून तांदूळ खरेदी करून तूट भरली जात आहे. यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची माहिती आहे.

पर्याय नसल्याने भरडाई गेल्या सात-आठ वर्षांपासून पूर्व विदर्भातील राईस मिल उद्योग डबघाईस आला आहे. त्यामुळे शासकीय धानाची भरडाई हाच एकमेव उत्पन्नाचा स्रोत राईस मिलर्सला आहे. त्यामुळे परवडत नसले तरी ते धानाची भरडाई करीत असल्याची माहिती आहे. 

"राईस मिलर्स असोसिएशनच्या माध्यमातून धानाचा प्रतिक्विंटल भरडाईचा दर १४० रुपये करण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. सोमवारी शासनाने भरडाई दरात ४० रुपयांनी वाढ करून राईस मिलर्सच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे." - अशोक अग्रवाल, अध्यक्ष विदर्भ राईस मिलर्स असोसिएशन

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीgondiya-acगोंदिया