शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

मांग गारुडी वस्तीसाठी सुरु झाला मदतीचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 06:00 IST

देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडविली जाणार नाही असे कधीही झाले नाही. येथील सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते विविध सामाजिक संघटना नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असून आजच्या या कठीण समयीही अशा या संघटना व कार्यकर्ते धावून येत आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । मांग गारुडी वस्तीत धान्य वाटप, लायन्स क्लब गोंदिया रॉयल सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया : दत्तक घेतलेल्या मांग गारूडी वस्तीतील सुमारे ७० कुटुंबीयांना अडचणीत बघून येथील लायन्स क्लब गोंदिया रॉयल त्यांच्या मदतीसाठी सरसावले. वस्तीतील या कुटुंबीयांना धान्याचे वाटप करून क्लबने स्विकारलेल्या पालकत्वाचे आपले कर्तव्य पार पडल्याचे गुरूवारी (दि.२६) बघावयास मिळाले.देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडविली जाणार नाही असे कधीही झाले नाही. येथील सामाजिक कार्यकर्त्यांपासून ते विविध सामाजिक संघटना नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी तत्पर असून आजच्या या कठीण समयीही अशा या संघटना व कार्यकर्ते धावून येत आहेत.लगतच्या ग्राम कुडवा येथील शिवाजीनगरात मांग गारूडी समाजाची वस्ती असून येथील सुमारे ७० कुटुंबीय हातावर पोट घेऊन चालतात. ‘लॉकडाऊन’मुळे या कुटुंबातील मोठ्यांपासून चिमुकल्यांच्याही जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या मदतीसाठी येथील लायन्स क्लब गोंदिया रॉयल ही संघटना धावून आली. संघटनेच्यावतीने गुरूवारी (दि.२६) वस्तीत जाऊन येथील कुटुंबांना प्रत्येकी ४ किलो तांदूळ, १ किलो डाळ, १ किलो मीठ, साबण व मास्क पाकिटांचे वाटप केले.वस्तीचे मार्गदर्शक प्रशांत बोरसे यांच्या मार्गदर्शनात क्लबचे सदस्य राहुल अग्रवाल, प्रितेश अग्रवाल, प्रशांत वडेरा, रिक्की पृथ्यानी, शुभम अग्रवाल, शिवा अग्रवाल, विनय शाहू, सौरभ अग्रवाल, कुशल चोपडा, हरलीन होरा यांनी वस्तीतील सर्व सदस्यांना धान्याच्या पाकिटांचे वितरण केले.सन २०१८ मध्ये वस्ती घेतली दत्तकसर्वांच्या मुलांप्रमाणे या मांग गारूडी समाजातील मुलेही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लायन्स क्लबने सन २०१८ मध्ये ही वस्ती दत्तक घेतली आहे. फक्त नावापुरतीच दत्तक नव्हे तर क्लबने वस्तीतील मुलांची शाळा भरविण्यासाठी दोन लाख रूपये खर्च करून पालावरची शाळा शेड तयार केले आहे.येथेच वस्तीतील मुलांची शाळा भरत आहे.क्लबकडून वस्तीत सातत्याने आरोग्य शिबिर, शैक्षणिक कार्यशाळा, कपडे वाटप, स्वातंत्र व प्रजास्ताक दिन एवढेच नव्हे तर क्लबमधील सदस्यांचे वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस तसेच सर्वच सणवारही साजरा केले जात आहेत. क्लब घेतलेल्या पालकत्वाचे कर्तव्य पूर्ण जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsocial workerसमाजसेवक