शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

धानाच्या कोठारातच धानाची घट

By admin | Updated: December 21, 2015 02:00 IST

पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वेळेवर पाऊस साथ देत नाही. दरवर्षी पिकांवर वाढणाऱ्या रोगांचा प्रकोप.

उतारा धानपिकांचा : नैसर्गिक संकटात भरडला जातोय शेतकरीदेवानंद शहारे गोंदियापर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. वेळेवर पाऊस साथ देत नाही. दरवर्षी पिकांवर वाढणाऱ्या रोगांचा प्रकोप. निसर्ग वेळी-अवेळी आपले रंग बदलत असल्यामुळे धानाचे कोठार म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत चालले आहे. मागील तीन वर्षांच्या मुख्य पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार जिल्ह्यात धान पीक घटत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये बागायती (पाण्याखालील क्षेत्र) धान पिकांचे प्रतिहेक्टरी उत्पन्न २५८३.८१४ किगॅ्र असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २४२५.१६८ किग्रॅ एवढे भरले. तर जिरायती (वरथेंबी पावसावर अवलंबून) क्षेत्रात प्रतिहेक्टरी उत्पन्न २३०२.९८६ किग्रॅ असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २१६१.५८३ किग्रॅ एवढे भरले.तर मागील वर्षी खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये बागायती (पाण्याखालील क्षेत्र) धान पिकांचे प्रतिहेक्टरी उत्पन्न ३३५२.०३८ किगॅ्र असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न ३१४६.२२३ किग्रॅ एवढे भरले होते. तसेच जिरायती (वरथेंबी पावसावर अवलंबून) क्षेत्रात प्रतिहेक्टरी उत्पन्न २८४२.५४२ किग्रॅ असून सुकवणीनंतर हेक्टरी सरासरी उत्पन्न २६६८.०१० किग्रॅ एवढे भरले होते.यावरून मागील वर्षाच्या मुख्य पीक कापनी प्रयोगाच्या तुलनेत यंदा बागायती धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ७६८.२२४ किग्रॅ घट झाली. तसेच सुकविल्यानंतरच्या धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ७२१.०५५ किग्रॅ घट झाली. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिरायती धान उत्पन्नात सरासरी प्रतिहेक्टरी ५३९.५५६ किग्रॅ घट झाली व सुकविल्यानंतरची घट सरासरी प्रतिहेक्टरी ५०६.४२७ किग्र घट झाल्याचे दिसून येत आहे.