पुराम यांचे साकडे : मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणीदेवरी : मागील एक महिन्यापासून क्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी करूनसुद्धा पुरेशा पावसाच्या अभावामुळे क्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषित करुन तत्काळ मदत देऊन दिलासा देण्याची मागणी आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन केली. त्यासंदर्भात एक पत्रही त्यांनी दिले.मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आ.पुराम यांनी सांगितले की, आमगाव विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांनी खरिप पिकांची पेरणी केली आहे. परंतु गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे फार मोठे संकट आलेले आहे. या माझ्या मतदारसंघातील शेतकरी हा शेतीवरच अवलंबून असल्यामुळे दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. मतदार संघात मोठे उद्योग धंद्याचे प्रकल्प नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे. सदर परिस्थिती लक्षात घेवून क्षेत्राला त्वरित दुष्काळग्रस्त घोषित करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी पुराम यांनी केली आहे.(प्रतिनिधी)
आमगाव विधानसभा क्षेत्र दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: September 12, 2015 01:39 IST