शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डेंजरस मलेरियाने घेतला दोघांचा बळी; जिल्ह्यात २०२ रुग्णांची नोंद

By कपिल केकत | Updated: September 9, 2023 18:14 IST

डासांपासून सावध राहणेच गरजेचे

गोंदिया : जिल्ह्यात सध्या विविध आजारांची साथ सुरू असून, जिल्हावासी पार त्रासून गेले आहेत. त्यातच आता धक्कादायक बाब म्हणजे जिल्हावासीयांच्या जिवावर डास उठले असून, मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्याची नोंद घेण्यात आली आहे. यावरून डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त डेंजरस असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यात आठ महिन्यांत मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. अशात जिल्हावासीयांनी डासांपासून जास्त सावध राहणेच गरजेचे झाले आहे.

पावसाळा म्हटला म्हणजे आजारांचाच काळ असतो. जिल्ह्यात डोळ्यांची साथ जेमतेम आटोक्यात आली असतानाच आता तापाच्या साथीने जिल्हा फणफणला आहे. यामध्ये व्हायरल, टायफॉईडचा ताप असतानाच आता मलेरियाच्या तापाने ताप वाढविला आहे. जिल्ह्याला डासांचे ग्रहण असून, काही केल्या येथून डासांचा नायनाट करणे शक्य नाही अशी स्थिती आहे. ही बाब गोंदिया शहरापुरतीच लागू होत नसून, अवघ्या जिल्ह्यालाच डासांनी ग्रासून सोडले आहे. डासांपासून मलेरिया व डेंग्यूचा जास्त प्रमाणात धोका दिसून येतो. त्यातही डेंग्यू म्हणताच भल्याभल्यांच्या अंगाला घाम फुटतो. मात्र, जिल्ह्यात डेंग्यूपेक्षा मलेरियाच जास्त जीवघेणा ठरताना दिसत आहे.

या वर्षात ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाच्या २०२ रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे, दोन रुग्णांना मलेरियामुळे जीव गमवावा लागला आहे. यातील एक तिरोडा तालुक्यातील असून, दुसरा रुग्ण सडक-अर्जुनी तालुक्यातील आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात डेंग्यूच्या ७९ रुग्णांची नोंद घेण्यात आली असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, मलेरियामुळे दोघांचा जीव गेल्यामुळे डासांपासून धोका अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

सर्वाधिक रुग्ण सालेकसा तालुक्यात

- सालेकसा तालुका जिल्ह्यात आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, याच तालुक्यात मलेरियाचे सर्वाधिक ८७ रुग्ण आढळून आले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर त्याला लागूनच असलेल्या देवरी तालुक्यात २८ रुग्ण आढळून आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गोरेगाव तालुका असून, २१ रुग्ण आढळून आले आहेत, तर सर्वांत कमी गोंदिया व तिरोडा शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक रूग्ण

- पावसाळ्यात सर्वाधिक आजार फोफावत असून, डासांचाही जोर याच काळात वाढतो. मात्र, या काळात मलेरिया व डेंग्यूचा धोका जास्त असतो असे दिसून येते. कारण, जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत, तर ऑगस्ट महिन्यात ९३ रुग्ण आढळून आले असून याच महिन्यात दोन रुग्णांचा जीव गेला आहे.

आवश्यक ती खबरदारी झाली गरजेची

- डासांवर उपाय म्हणून हिवताप विभागाकडून ग्रामीण भागात फवारणी व सर्वेक्षण केले जाते. शहरात नगर परिषद फवारणी करते. मात्र, त्यांची फवारणी किती प्रभावी असते हे सर्वांनाच ठावुक आहे. अशात आता नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी डासांपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी आतापासून घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांचा तालुकानिहाय तक्ता

तालुका- जानेवारी ते ऑगस्ट - फक्त ऑगस्ट - मृत्यू

गोंदिया- ०७- ०५-००

तिरोडा- २१-१४-०१

आमगाव- ०६-००-००

गोरेगाव- २४-१०-००

देवरी- २८-१५-००

सडक-अर्जुनी- १२-०६-०१

सालेकसा- ८७-३४-००

अर्जुनी-मोरगाव- १५-०८-००

गोंदिया शहर- ०१-००-००

तिरोडा शहर- ०१-००-००

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूgondiya-acगोंदियाDeathमृत्यू