लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमऱ्या पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे.माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात. पावसाळ्याच्या हंगामात एक एकर शेतीमध्ये चवळीच्या शेंगा, भेंडी, कारली, काकडी, दोडके, दुधी या भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी जंगलातील खाकऱ्याचा उपयोग न करता उंबरठ्या पद्धतीचा अवलंब करुन भाजीपाला पिकाची लागवड त्यांनी केली आहे. स्वत:च्या शेतात पत्नी, मुलगा व सून यांच्यासह काही मोजक्या मजुरांच्या मदतीने स्वत:च्या प्रयोगशील कतृत्वाने हंगामानुसार विविध पिकांची लागवड जयगोपाल करतात.सध्या चवळी, काकडी, दोडके, दुधी, कारले या पिकांचे वेल जाण्यासाठी मांडव न करता त्यांनी सुत, नॉयलान केनचा वापर करुन बासावर पिकांचे वेल जाण्यासाठी आकर्षक मंडपाच्छादनासारखी व्यवस्था केली आहे.बाक्टी ते सोमलपूर मार्गावर असलेले त्यांचे शेत येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष केंद्रीय करीत आहे. शेतामध्ये पिकविण्यात येणाºया पिकांना घरच्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुळातच आम्ही माळी समाजाचे असल्याने भाजीपाला पीक घेण्यावरच आमचा कल असून त्याची विक्री सुद्धा घरच्या सदस्यांच्या सहाय्याने स्वत: करीत असतो असे ते म्हणाले.बारमाही उत्पादन घेणारे जयगोपाल बनकर यांनी शासकीय योजनांचा आजपावेतो कोणताही लाभ उचलला नसल्याचे आवर्जून सांगितले. अख्या कुटुंब शेतीमध्ये राबून नाविण्यपूर्ण पीके घेण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाच्या योजना पदरी पाडण्यासाठी वारंवार चकरा मारुनही हाती लागत नसल्याचा त्यांनी आपला अनुभव कथन केला. एकंदरीत जयगोपाल बनकर अंगमेहनतीने अल्पश: शेतजमिनीतून बारमाही नावीन्यपूर्व पिक घेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालविताना दिसतात.
उमऱ्या पद्धतीने भाजीपाला पिकाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:07 IST
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाक्टी येथील जयगोपाल बनकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी धानाचे पीक न घेता एक एकर शेतीमध्ये उमºया पद्धतीने भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. माळी समाजाचे असलेले अल्पभूधारक बनकर हे बारमाही पीक घेतात.
उमऱ्या पद्धतीने भाजीपाला पिकाची लागवड
ठळक मुद्देशेतकरी बनकर यांचा प्रयोग : शासकीय योजनांपासून अलिप्त