लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील संजयनगर परिसरातील रहिवासी महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शहरातील छोटा गोंदिया बायपास रस्त्यावरील पुला खाली रेल्वे रूळावर मंगळवारी (दि.२५) सकाळी तिचा मृतदेह मिळून आला. रामेश्वरी उर्फ बाली दिनेश शहारे (३४,रा.संजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.रामेश्वरी येथील एका हॉटेलात दररोज दुपारी २ ते रात्री १२ वाजतापर्यंत काम करीत होती. नेहमी प्रमाणे सोमवारी (दि.२४) दुपारी ती घरून कामावर गेली. परंतु रात्री घरी परतलीच नाही. मंगळवारी (दि.२५) सकाळी छोटा गोंदिया बायपास येथे रेल्वे रूळावर तिचा मृतदेह दिसून आला. तिचा चेहरा दगडाने ठेचलेला तिचा खून करून मृतदेह रेल्वे रूळावर टाकण्यात आल्याचे दिसले. तिचा गाडीने अपघात झाला असावा असे दाखविण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकल्याचे बोलले जात आहे. रामेश्वरीचा भाऊ विलास अनंतराम नागोसे (४०,रा. मूर्री) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वरीला पती व दोन अपत्य असल्याचे सांगितले जाते. सदर घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर करीत आहेत
दगडाने ठेचून महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 20:10 IST
शहरातील संजयनगर परिसरातील रहिवासी महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शहरातील छोटा गोंदिया बायपास रस्त्यावरील पुला खाली रेल्वे रूळावर मंगळवारी (दि.२५) सकाळी तिचा मृतदेह मिळून आला. रामेश्वरी उर्फ बाली दिनेश शहारे (३४,रा.संजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
दगडाने ठेचून महिलेचा खून
ठळक मुद्देआरोपी फरार : हॉटेलात जात होती कामाला