शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
4
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
5
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
6
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
7
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
8
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
9
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
11
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
12
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
13
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
14
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
15
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
16
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
17
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
18
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
19
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
20
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डवर लोन काढायचे अन् गंडवायचे, टोळीला अटक; आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलची कारवाई

By नरेश रहिले | Updated: December 8, 2023 19:33 IST

होमगार्डची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक

गोंदिया: क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून ७ लाखांचे लोन घेऊन ७० टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलने केला आहे. या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ डिसेंबर रोजी करण्यात आली.

सडक-अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथील होमगार्ड धनराज पुंडलिक सयाम (३०) यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्डवर ७ लाख रुपयांचे लोन मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार केले. त्यांच्या नावावर ७ लाखांचे लोन मंजूर झाले असताना आरोपींनी त्यांच्या अकाउंटवर फक्त २ लाख ३७ हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरित ४ लाख ६३ हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग केली. त्यांच्याबरोबर इतर लोकांचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले. पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहायक पोलिस निरीक्षक किरण पावसे, पोलिस उपनिरीक्षक चावके, पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, रंजित बिसेन, खेमचंद बिसेन, हंसराज भांडारकर, अतुल कोल्हटकर, योगेश रहिले, चालक घनश्याम कुंभलवार यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.आरोपींमध्ये यांचा समावेशसिद्धांत चव्हाण (३०), रा. खाडीपार, प्रवीण पाटील (२७), रा. देवरी, कैलाश भोयर (३५), रा. चोपा, निखिलकुमार कोसले (२५), विक्कीसिंग कोसले (२३), नीलेश सुन्हारे (२०), तिन्ही रा. रायपूर व कैलाश भोयर (३५) यांच्यासह इतर साथीदार यांचा समावेश आहे.

आरोपींना नागपुरातून केली अटकपोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांनी स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल व नक्षल सेल येथील पोलिस अधिकारी अंमलदारांची पथके तयार केली होती. त्या आरोपींना नागपूरवरून ताब्यात घेण्यात आले.अनेकांची फसवणूक केल्याची दिली कबुलीअटक करण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी क्रेडिट कार्डद्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा गोंदियाचे पथक करीत आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसfraudधोकेबाजी