शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तयार करा

By admin | Updated: May 10, 2017 01:06 IST

येथील जिल्हा क्रीडा संकुलात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे जलतरण तलाव तयार करण्यात आले आहे

राजकुमार बडोले : राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे जलतरण तलाव लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : येथील जिल्हा क्रीडा संकुलात राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे जलतरण तलाव तयार करण्यात आले आहे. या जलतरण तलावाचा फायदा जिल्ह्यातील युवक-युवतींना होणार आहे. भविष्यात गोंदियातील या तलावातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू तयार व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या लोकार्पणप्रसंगी ते शनिवारी (दि.६) बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, भाजपा शहराध्यक्ष सुनील केलनका, न.प. बांधकाम समिती सभापती घनश्याम पानतवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, नगरसेवक भरत क्षत्रीय, क्रांती जायस्वाल, राकेश ठाकूर, अपूर्व अग्रवाल उपस्थित होते. राज्य शासनाने या क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी भरभरून मदत केल्याचे सांगून पालकमंत्री बडोले यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा मंत्री तावडे व आमदार अग्रवाल यांनी एवढे मोठे जलतरण तलाव तयार करण्यास हातभार लावल्याबद्दल आभार मानले. तसेच ज्यांना जलक्रीडा क्षेत्रात प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी हे तलाव उपयुक्त आहे. जिल्हा क्रीडा संकुलातून भविष्यात अनेक प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊन जिल्ह्याचे नावलौकीक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अग्रवाल यांनी, हे जलतरण तलाव राज्यात आगळावेगळे आहे. आॅलंपीक दर्जाचे हे तलाव असून ेमुंबई, नवी मुंबई व पुण्यानंतर गोंदियात अशा प्रकारचे तलाव तयार करण्यात आले आहे. येथील जिल्हा क्र ीडा संकुल वेगळ्याप्रकारे व वैशिष्ट्यपूर्ण तयार करण्यात येत आहे. एकीकडे राज्यातील जिल्हा क्र ीडा संकुले हे आठ कोटी रूपयांतून तयार होत असताना गोंदियाच्या क्रीडा संकुलाला सुरूवातीलाच १४ कोटी रूपयांची मान्यता मिळाली आहे. येथील उच्च दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री बडोले यांनी देखील अतिरिक्त निधी देण्यास सहकार्य केले. पहिला चार कोटींचा निधी जिल्हा क्र ीडा अधिकारी यांना प्राप्त झाला आहे. संकुलाच्या निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवती राजाभोज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करु न तसा प्रस्ताव जिल्हा क्रीडा संकुल समितीने मान्य केल्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलांना जलक्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची संधी या तलावामुळे मिळाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक क्र ीडा उपसंचालक रेवतकर यांनी मांडले. संचालन क्रीडा अधिकारी अनिल निमगडे यांनी केले. आभार जिल्हा क्र ीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी मानले. जलतरणपटूंनी सादर केले प्रकार या जलतरण तलावाच्या लोकार्पण प्रसंगी राष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके, रिध्दी जनबंधू यांच्यासह अन्य जलतरणपटूंनी मान्यवरांसमोर फास्टेट स्ट्रोक, बटरफ्लाय, बेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आदी जलक्र ीडा प्रकार सादर केले. जलतरण तलावाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुलांना पुढे येण्याची एक संधीच मिळ्ल्याचे दिसून येत आहे.