शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वाहनाच्या धडकेत नगरसेवक पांडे ठार

By admin | Published: December 12, 2015 4:17 AM

गोंदिया शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गोंदियाचे नगरसेवक अनिल

कुडव्या नाक्यावरील अपघात : ‘मॉर्निंग वॉक’ करणारे दोघे गंभीरगोंदिया: गोंदिया शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात गोंदियाचे नगरसेवक अनिल भवानीप्रसाद पांडे (६२) हे ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारच्या सकाळी ७ वाजतादरम्यान कुडवा नाक्याजवळ घडली.नगरसेवक पांडे हे नेहमीप्रमाणे रामनगर येथील राजेश पटेल व रेलटोली येथील संदीप (बबलू) ठाकूर यांच्यासोबत शुक्रवारच्या सकाळी मॉर्निंग वॉककरीता गेले असताना रामनगर ते कुडवा नाक्याकडून मरारटोलीच्या दिशेने कुडवा भागाकडे येत होते. याचवेळी एका अज्ञात चारचाकी वाहनाने तिघांनाही धडक दिली. त्यांना केएमजे हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान अनिलकुमार पांडे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेसंदर्भात पोलीस कर्मचारी कृष्णकुमार ठाकरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ), मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी त्या ठिकाणावरून एक ट्रक व एक मेटॅडोर जात होते. यापैकी कोणत्या वाहनाने त्यांना धडक दिली याची माहिती मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या इसमांकडून मिळाली नाही. पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)कारच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मुलगा ठार४माजी नगरसेवक विकास शेंडे यांचे चिरंजीव हर्षल (२४) यांना रात्री फुलचूर रस्त्यावर एका कारने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारच्या रात्री ११.३० वाजतादरम्यान हर्षल शेंडे हे आमगाववरून मोटारसायकलने (एमएच ३५ यू ५०७६) गोंदियाला येत होते. फुलचूरच्या कामधेनू शोरूमजवळ जलद गतीने धावणाऱ्या अल्टो कारने त्याला उडविले. मृतक हर्षलचा वीडियोग्राफीचा व्यवसाय होता. स्थानिक एक केबल संचालकाला सेवा देत होता. तेथून परतताना सदर घटना घडली.