लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेअसून देशाच्या इतिहासात प्रथमच रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. लॉकडाऊनचा अनेक उद्योग धंद्यांना फटका बसला असून गोंदिया रेल्वे स्थानकाला सुध्दा साडेचार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर १४ एप्रिलनंतरही रेल्वे वाहतूक सुरळीत होते की नाही हेअद्याप निश्चित झालेले नाही.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच देशभरातील रेल्वे वाहतूक मागील १७ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजाराहून अधिक प्रवाशी प्रवास करतात. तर दररोज १० ते १२ लाख रुपयांचे उत्त्पन्न रेल्वे आरक्षणाच्या माध्यमातून गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त होते. जवळपास ७५ प्रवाशी गाड्या आणि तेवढ्याच मालगाड्या या मार्गावरुन धावतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर सातत्याने प्रवाश्यांची वर्दळ पाहयला मिळत होती. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा देखील लागू असल्याने या भागात जाणारे बरेच प्रवासी याच रेल्वे स्थानकावरुन प्रवास करतात. त्यामुळे या रेल्वे स्थानकाला तिकीट विक्रीतून दररोज जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. आरक्षण तिकीट आणि नियमित तिकीटांची विक्री लक्षात घेता जवळपास २० ते २० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत होते. मात्र मागील १७ दिवसांपासून रेल्वे प्रवाशी वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने गोंदिया रेल्वे स्थानकाचे साडेचार कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यास आणि रेल्वेची प्रवाशी वाहतूक ठप्प राहिल्यास नुकसानीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेल्वेची पार्सल सेवालॉकडाऊनमुळे रेल्वेसह सर्वच वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यामुळे याचा जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये तसेच या वस्तुंची टंचाई निर्माण होवू नये यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने रेल्वेची जीवनावश्यक वस्तुंची पार्सल सेवा सुरू ठेवली आहे.त्यामुळे अनेकांना थोडा फार दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे.कुलींसमोर रोजगाराचा प्रश्नसध्या रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने गोंदिया रेल्वे स्थानकावर कुली म्हणून काम करणाऱ्या ६० जणांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. मागील १७ दिवसांपासून कुठलाच रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यासमोर कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान गोंदिया रेल्वे स्थानकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची अडचण ओळखून या ६० कुलींना अन्नधान्य व किराणा सामानाचे वाटप केले त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाला साडेचार कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रथमच लॉकडाऊनच्या कालावधीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच देशभरातील रेल्वे वाहतूक मागील १७ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजाराहून अधिक प्रवाशी प्रवास करतात.
कोरोनामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाला साडेचार कोटींचा फटका
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा ठप्प : नवीन आदेशापर्यंत निर्णय नाहीच