शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

कोरोनानंतरचे साइड इफेक्टस वाढले; औषधी काळजीपूर्वक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 05:00 IST

कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले तर औषधी काळजीपूर्वक घ्या, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. ज्या रुग्णांमध्ये मधुमेह आहे तसेच आयसीयूमध्ये अधिक काळ उपचार घेत असलेल्यांनी काळजी घेतली नाही तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णही आढळले आहेत. गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आतापर्यंत आठ ते दहा रुग्णांची नोंद व उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देमधूमेह आणि आयसीयुमध्ये उपचार घेणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दररोज पाच-सहा रुग्णांची नोंद होत आहे. स्टेरॉईडचा अतिवापर तसेच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होत आहे. परिणामी कोरोनानंतरचे साईड इफेक्ट्स वाढले तर औषधी काळजीपूर्वक घ्या, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत. ज्या रुग्णांमध्ये मधुमेह आहे तसेच आयसीयूमध्ये अधिक काळ उपचार घेत असलेल्यांनी काळजी घेतली नाही तर अशा रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळली आहेत. यात राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये रुग्णही आढळले आहेत. गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आतापर्यंत आठ ते दहा रुग्णांची नोंद व उपचार सुरू असल्याची माहिती आहे.  म्युकरमायकोसिसपासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असे सांगण्यात येते.   म्युकरमायकोसिस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मायक्रोबायोलॉजिस्ट, न्युरोलॉजिस्ट, ईएनटी डॉक्टर्स, ऑप्थॅमोलॉजिस्ट, डेन्टिस्ट, सर्जन, बायोकेमिस्ट यांच्याशी त्वरित भेटून सल्ला घेणे आवश्यक आहे..

काय होतात परिणामम्युकरमायकोसिस आजार झाल्यास रुग्णांमध्ये नाक बंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचे हाड दुखणे, चेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे,  दात दुखणे, दात हलणे व पडणे, जबडा दुखणे, डोळे दुखणे, छाती दुखणे, श्वास घेण्यात त्रास आदी लक्षणे दिसू लागतात. नाक बंद झालेल्या सर्वच रुग्णांना हा आजार झाल्याचे समजू नका. हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे रुग्ण जास्त काळ  इतर आजारांचा उपचार घेतात त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या संसर्गाचा धोका वाढतो.

रेमडेसिविरचे साईड इफेक्टसरेमडेसिविरचा वापर पूर्णपणे प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, मात्र उपचाराच्या प्रायोगिक पद्धतीनुसार हे इंजेक्शन देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जात आहे.  संसर्ग झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पाच दिवसांसाठी इंजेक्शनचा डोस देण्यात यावा. दहा दिवसांसाठी हा डोस देण्याची गरज नाही. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही रुग्णांमध्ये उलट्या होणे, हातपाय थरथरणे, जुलाब, चक्कर येण्यासारखे त्रासही दिसून आले आहेत.

काय काळजी घ्यायची 

धूळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या  ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा. हा बुरशीजन्य आजार आहे. स्वच्छता पाळा तसेच अन्य नियमांचे पालन करा. या आजारावरील ‘एम्फोटेरीसीन बी’ हे इंजेक्शन महागडे आहे. परिणामी लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करा. - डॉ. संजय भगतईएनडी तज्ज्ञ 

काेरोना रुग्णाला म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळल्यास याबाबत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचविलेला औषधोपचार करावा. याबाबत संशय आल्यानंतर किंवा तसे स्पष्ट झाल्यानंतर औषधोपचार घेण्यास उशीर करू नका.या आजाराची लक्षणे दिसताच क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.- डॉ. विकास जैन, अध्यक्ष आयएमए.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य