गोंदिया तालुक्याचे कोरोना मीटर सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 05:00 AM2021-03-01T05:00:00+5:302021-03-01T05:00:22+5:30

जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात असली तर गोंदिया तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

Corona meter of Gondia taluka continues | गोंदिया तालुक्याचे कोरोना मीटर सुरुच

गोंदिया तालुक्याचे कोरोना मीटर सुरुच

Next
ठळक मुद्देअधिक सतर्कता बाळगण्याची गरज : ११ बाधितांची नोंद, बाधितांचा आकडा ८ हजार पार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :   मागील आठ दहा दिवसांपासून गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील कोरोनाचे मीटर सातत्याने सुरुच असून आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ८३२० वर गेला आहे. तर सद्यस्थितीत १०४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 
जिल्ह्यात रविवारी ११ बाधितांची नोंद झाली तर दोन बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १० कोरोनाबाधित रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तर गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात इतर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात असली तर गोंदिया तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ७०५४९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ५८७७९ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्याठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८६०३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२३९८ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत १४४३३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १३० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १५ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. 
आतापर्यंत १ लाख ४० हजार चाचण्या 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ४० हजार चाचण्या करण्यात आल्या आहे. यात १४४३३ कोरोना बाधित आढळले असून १४११८ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर १२.९ असून मृत्यू दर १.२० टक्के आहे. 
संसर्ग टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करा 
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरच नियमित वापर करावा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि दिवसभरात वारंवार हातपाय स्वच्छ पाण्याने धुवावे, आदी गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. 
 

 

Web Title: Corona meter of Gondia taluka continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.