कोरोना बाधित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:14+5:30

विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती आहे.

The corona-infected patient fled the medical college | कोरोना बाधित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पळाला

कोरोना बाधित रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पळाला

Next
ठळक मुद्देआरोग्य प्रशासनच अनभिज्ञ : तो कर्मचारी आरोग्य विभागाचाच, अनागोंदी कारभार कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्ण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पळाल्याची घटना मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पण हा रुग्ण पळल्याची माहिती येथील रुग्णालय प्रशासनाला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
तिरोडा येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका रुग्णाला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र २ ऑगस्ट रोजी त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते. नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर तेथून तो पळून आला होता. यानंतर पुन्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला १०८ या रूग्णवाहिकेने मंगळवारी सकाळी ८ वाजता गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. परंतु तो कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी हा रुग्ण तिरोडा परिसरात आला असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका डॉक्टरला फोन करुन दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे तोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयातून पसार झाला असल्याची माहिती येथील व्यवस्थापनालाच नव्हती. यावरुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य यंत्रणा कोरोना संक्रमण काळात किती सजग आहे दिसून येते. पळून गेलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा आरोग्य विभागाचा कर्मचारी असल्याची माहिती आहे. दरम्यान तिरोड्याजवळ हा रुग्ण आढळला असून त्याला परत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यासाठी आरोग्य विभागाने सूत्रे हलविल्याची माहिती आहे. याप्रकरणा संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. पी. रुखमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी याप्रकरणाची चौकशी करुन सांगतो असे सांगितले.

Web Title: The corona-infected patient fled the medical college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.