शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्हा बँकेवर सहकार पॅनलचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:23 IST

सहकारला ११ ; परिवर्तन पॅनलला ९ जागा : दोन्ही विद्यमान आमदारांचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुती समर्थित सहकार पॅनलने ११ जागांवर विजय मिळवत बँकेवर वर्चस्व स्थापन केले, तर परिवर्तन पॅनलने ९ जागा जिंकत काट्याची लढत दिली. या निकालामुळे खासदार प्रफुल्ल पटेल यांची सहकार क्षेत्रातील पकड पुन्हा अधोरेखित झाली आहे.

जिल्हा बँकेच्या एकूण २० संचालकपदासाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माजी आ. राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल हे दोन संचालक अविरोध निवडून आल्याने १८ संचालकपदासाठी रविवारी (दि. २९) निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत एकूण ८९४ मतदारांपैकी ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सोमवारी (दि. ३०) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी पार पडली. यात सहकार पॅनलचे ११, तर परिवर्तन पॅनलचे नऊ संचालक निवडून आले. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर पकड कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात होती. या निवडणुकीत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार परिणय फुके आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

विशेष म्हणजे या निवडणुकीत सहकार पॅनलकडून आमदार राजकुमार बडोले व विजय रहांगडाले हे दोन्ही विद्यमान आमदार विजयी झाल्याने त्यांनी या माध्यमातून आता सहकार क्षेत्रात एन्ट्री केली आहे.

...या दिग्गजांचा झाला पराभवमाजी आमदार दिलीप बन्सोड यांच्यासह बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, संचालक उषा मेंढे, रेखलाल टेंभरे, राजकुमार कुथे, राजू जैन, गजानन परशुरामकर या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाbankबँक