शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

लोकवर्गणीतून गोळा झालेल्या रकमेतून सुरू होणार गरिबांसाठी कान्व्हेंट शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:46 IST

गरीब फाउंडेशन युवा संघटना : समाजासमोर ठेवला आदर्श

गोंदिया : होळी, धुळवडीला ढोल-ताशाच्या गजरात युवक डीजेच्या तालावर नाचून बोजारा मागणे, मग जमा झालेल्या पैशातून धमाल मस्ती अथवा इतर गोष्टी करतात; पण या परंपरेला फाटा देत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथील गरीब फाउंडेशन युवा संघटनेने शिमगा उत्सवात लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून स्थानिक गोरगरिबांच्या मुलांसाठी पूर्व प्राथमिक ( कॉन्व्हेंट) शिक्षणाची सोय व्हावी यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. गरीब फाउंडेशन युवा संघटनेच्या या उपक्रमाने समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. 

बोंडगाव सुरबन येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग आहेत. येथून शिक्षण पूर्ण केलेले माजी विद्यार्थी हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांच्या कल्पनेने गरीब फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. हल्ली शैक्षणिक क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, या युवा संघटनेच्या माध्यमातून गावातील शिक्षणाचा स्तर उंचवावा, सामान्यातल्या सामान्य माणसांच्याही लेकराला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळेतीलच एका वर्गखोलीत पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी दुजोरा देत आर्थिक पाठबळ देण्याचे मान्य केले. शाळा व्यवस्थापन समितीनेही यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. येत्या सत्रात अगदी लोकवर्गणीतून येथे कान्व्हेंट सुरू होणार आहे. गरीब फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

तरुणांसमोर ठेवला आदर्शशिमगोत्सवातून गावकऱ्यांनी गरीब फाउंडेशनला दिलेली जवळपास २५ हजार रुपयांची वर्गणी इतर गोष्टींवर खर्च न करता शैक्षणिक कामासाठी खर्च करण्याचा निश्चय केला. अलीकडे तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. होळी, धुळवडीला मौजमस्ती करण्याकडे तरुणांचा अधिक कल असतो; पण या परंपरेला फाटा देत बोंडगाव सुरबन येथील युवकांनी पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याची केलेली धडपड आणि उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, इतरही गावांनी यातून प्रेरणा घ्यावी.

टॅग्स :gondiya-acगोंदियाEducationशिक्षण