गोरेगाव : मागील सहा महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाईत वाढ होत असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देशात भाजपचे सरकार आल्यापासून डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडरच्या किमतींत सातत्याने वाढ होत आहे. सामान्य नागरिकांना जीवन जगताना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे किमती त्वरित कमी करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात युवा तालुका अध्यक्ष राजकुमार बोपचे, प्रवक्ता सोमेश रहांगडाले, बाबा यावलकर, शेखर बघेले, योगेश चौधरी, विजय कुर्वे, प्रदीप जैन, गिरधारी कटरे, लालचंद चव्हाण, राजेश बिसेन, भुपेश गौतम, कमलेश बारेवार, चौकलाल येडे यांचा समावेश होता.