लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम होती. तर काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी (दि.१०) सकाळी सुध्दा पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात सरासरी ६५.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.मागील दोन महिने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे ४६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. केलेली रोवणी आणि पऱ्हे सुध्दा वाळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. तर रविवारी आणि सोमवारी (दि.१०) सकाळी १० वाजेपर्यंत काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे नदी, नाले दुथळी भरुन वाहत होते. काही नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने चार ते पाच गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. गेल्या २४ तासात सरासरी २१६४.६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर १८ महसूल मंडळात अतिवृष्टींची नोंद झाली आहे. यात गोंदिया तालुक्यातील गंगाझरी ६७ मिमी, रतनारा ७१ मिमी, दासगाव ७८ मिमी, रावणवाडी ८९ मिमी, कामठा १५२ मिमी तर गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी १३० मिमी, गोरेगाव १७८ मिमी आणि तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा ७० मिमी, वडेगाव ७०.४० मिमी, ठाणेगाव ६७ मिमी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी ६६ मिमी, अर्जुनी ६६ मिमी आणि देवरी तालुक्यातील देवरी ८५ मिमी, चिचगड ८५ मिमी, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड महसूल मंडळात १५० मिमी, डव्वा ६८ मिमी, सडक अर्जुनी ९१.६० मिमी पावसाची नोंद झाली. दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST
मागील दोन महिने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे ४६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली होती. परिणामी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली होती. केलेली रोवणी आणि पऱ्हे सुध्दा वाळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारीपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यात पावसाची संततधार
ठळक मुद्दे१८ महसूल मंडळात अतिवृष्टी : सरासरी ६५ मिमी पावसाची नोंद : नदी नाल्यांना पूर