शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

वजन काटा विक्रेत्याला ग्राहक न्यायमंचचा झटका

By admin | Updated: December 10, 2014 23:00 IST

वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण

गोंदिया : वजन काटा खरेदी केल्यावर त्यात बिघाड झाला. बिघाड दुरूस्त करण्यासाठी ग्राहकाने वारंवार दुकानदाराला विनंती केली. मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने ग्राहकाने ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. मंचाने आपल्या न्यायनिवाड्यात नुकसान भरपाईसह वजन काट्याची किंमत त्या ग्राहकाला परत करण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे.
सडक/अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील रहिवासी चत्रुगण गणपत ब्राह्मणकर असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांचे गावातच किराणा दुकान आहे. त्यांनी गोंदियाच्या देशबंधू किर्ती इंन्टरप्रायजेसचे संचालक मुकेश भोजवानी यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजन काटा ७ जानेवारी २०१३ रोजी चार हजार ५०० रूपयांत खरेदी केला. २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यात बिघाड झाल्याचे त्यांनी दूरध्वनीवरून कळविले. मात्र भोजवानी यांनी दखल घेतली नाही आणि वजन काटा दुरूस्तही करून दिला नाही. यानंतर ग्राहक ब्राह्मणकर यांनी त्यांना पत्र पाठवून दुरूस्तीची मागणी केली, तसेच वैधमापन शास्त्र यांनासुद्धा पत्र पाठविले. मात्र दखल घेण्यात न आल्याने त्यांनी १२ हजार ५०० रूपये नुकसानभरपाई मिळावी म्हणून ९ आॅक्टोबर २०१३ रोजी न्यायमंचात तक्रार दाखल केली.
मंचामार्फत नोटीस पाठविल्यावर किर्ती इंटरप्रायजेसचे संचालक भोजवानी यांनी हजर होवून लेखी जबाब नोंदविला. त्यात ग्राहक ब्राह्मणकर यांनी ७ जानेवारी २०१३ रोजी ३० किलो क्षमतेच्या वजन काट्याची तोंडी मागणी चार हजार ५०० रूपयांत केली होती. त्याआधारे एक हजार ४५० रूपयांचा जुना वजन काटा व एक हजार ५० रूपये रोख दिले होते.
उर्वरित दोन हजार रूपये १६ जानेवारी २०१३ रोजी देण्याचे ठरले होते. मात्र त्या दिवशी रूपये न देता त्यांनी २६ जानेवारी २०१३ रोजी दिले. त्यानंतर बिघाड झाल्याचे कळविल्यावर दुकानातील अभियंत्याला १२ जानेवारी व १५ फेब्रुवारी २०१३ रोजी दुरूस्तीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र बाह्मणकर एकदा शेतात तर दुसऱ्यांदा बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांना दूरध्वनीवरून काटा प्रयोग शाळेत आणल्यावरच दुरूस्त होईल किंवा रक्कम परत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेत काटा आणलाच नाही, असे म्हटले.
दोन्ही पक्षांची कागदपत्रे व युक्तीवाद ऐकून न्यायमंचाने कारणमिमांसा केली. ब्राह्मणकर यांनी दुरूस्तीची मागणी केल्यावरही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. शिवाय ते अपंग असल्यामुळे कुठे जावू शकत नाही.
यावरून किर्ती इंदरप्रायजेसने सर्व प्रकारे टाळाटाळ करून न्यूनतापूर्ण अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला. शिवाय अभियंत्याला तक्रारकर्ते ब्राह्मणकर यांच्या घरी वजनकाटा दुरुस्तीसाठी पाठविले, ही बाब सिद्ध करण्यासाठी किर्ती इंटरप्रायजेसने अभियंत्याचे शपथपत्र किंवा कोणतेही दस्तऐवज आदी पुरावे दाखल केले नाही. त्यामुळे सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे न्यायमंचाने सांगितले.
यावर न्यायमंचाने ग्राहक ब्राह्मणकर यांची तक्रार अंशत: मान्य करून इलेक्ट्रानिक वजन काटा परत घ्यावा व त्याची किंमत चार हजार ४५० रूपये त्यांना द्यावे, तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानभरपाई म्हणून तीन हजार रूपये द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने किर्ती इंटरप्रायजेसच्या संचालकांना दिला आहे. (प्रतिनिधी)