शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महागाई विरोधात काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:45 IST

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून अद्यापही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणावर केली टीका : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून अद्यापही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तर पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या भाजप सरकारने राफेल लडाकू विमान खरेदीत लाखो रूपयांचा घोटाळा केल्याचा प्रकार पुढे आला. या सरकारच्या जनहित विरोधी धोरणांचा व वाढत्या महागाईचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (दि.२८) जिल्हा काँग्रेसतर्फे उपविभागीय कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला.स्थानिक प्रताप लॉन मनोहर चौक येथून आ.गोपालदास अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे यांच्या नेतृत्त्वात मोर्चाला सुरूवात झाली. मोर्च्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. या वेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या जनहित विरोधी धोरणांचा निषेध नोंदवित नारेबाजी केली. तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.लोकांना अच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजप सरकारचे हेच अच्छे दिन आहेत का, केवळ मोठ्या मोठ्या घोषणा देवून शासन जनतेची दिशाभूल करीत असल्याचे सांगत रोष व्यक्त केला. त्यानंतर हा मोर्चा स्थानिक मनोहर चौकातून जयस्तंभ चौक, चांदनी चौक, गोरलाल चौक, नेहरू चौक मार्गे शहराच्या मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या वेळी सभेला मार्गदर्शन करताना आ.अग्रवाल यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.राफेल विमान खरेदी प्रकरणात भाजप सरकारने श्वेत पत्रिका काढून या खरेदी प्रकरणाचा उलगडा करावा. सरकारने लडाकू विमान खरेदी प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करुन काँग्रेसच्या काळात ५०० कोटी रुपयात मिळणारे राफेल लडाकू विमान आता १६०० कोटी रुपयांचे कसे झाले हे स्पष्ट करावे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरामुळे गृहिनींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी व पीक विमा योजनेचा लाभ अद्याही शेतकºयांना मिळालेला नाही. त्यामुळे हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार असल्याचा आरोप केला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये जनता नक्कीच अशा सरकारला धडा शिकवेल असे सांगितले. जिल्हाध्यक्ष कटरे म्हणाले लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.प्रदेश काँग्रेस सचिव उमाकांत अग्नीहोत्री यांनी सुध्दा भाजप सरकारवर टिका केली. तसेच जनतेला खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर आ. अग्रवाल यांच्या नेतृत्त्वात विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. या वेळी माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, माजी आमदार रामरतनबापू राऊत, डॉ. झामसिंह बघेले, पी.जी.कटरे, नामदेव किरसान, न.प.सभापती शकील मंसुरी, राधेलाल पटले, पन्नालाल सहारे, प्रदेश एनएसयुआय उपाध्यक्ष संदिप रहांगडाले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन, उषा मेंढे, अशोक लंजे, रत्नदीप दहिवले, माधुरी हरिणखेडे, चुन्नीभाऊ बेंद्रे, के.आर.शेंडे, डेमेंद्र रहागंडाले, अमर वराडे, जितेंद्र कटरे, राकेश ठाकूर, सुनील तिवारी, देवा रु से, भागवत मेश्राम, अपूर्व अग्रवाल, विशाल शेंडे, संदिप ठाकुर, इसूलाल भालेकर, सहेसराम कोरोटे,राजेश नंदागवळी, विशाल अग्रवाल, चिकू अग्रवाल, विक्की बघेले, अर्जुन नागपूरे, निशांत राऊत, सुशिल रहागंडाले, गोंदिया भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, अजीत गांधी, प्रकाश रहमतकर, निर्मला मिश्रा, व्यकंट पाथरु,अर्जुन नागपूरे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस