शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भूजल अधिनियमातील अटींचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:41 IST

शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदून भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. याचा परिणामी भूगर्भातील संरक्षीत पाणी साठ्यावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की यावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल अधिनियम लागू केला आहे. मात्र यातील काही जाचक अटींचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देगंगाधर परशुरामकर : कायद्यावर आक्षेप घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कखजरी : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदून भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. याचा परिणामी भूगर्भातील संरक्षीत पाणी साठ्यावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की यावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी राज्य शासनाने भूजल अधिनियम लागू केला आहे. मात्र यातील काही जाचक अटींचा फटका शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने २५ जुलै २०१८ ला असाधारण भाग ४ ब मध्ये महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमाद्वारे अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसुचनेवर १ सप्टेंबर २०१८ पर्यंत नागरीकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यावर १५ आॅगस्टला होणाºया ग्रामसभेत विचार विनिमय करुन मुदतीचे आत सूचना व आक्षेप नोंदवावे. सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवावेत. असे जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.राज्यात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याची झळ पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीला लागणाऱ्या सिंचनालाही बसत आहे. पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी विंधन विहिरीच्या माध्यमातून व इतर मार्गाने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यावर काही बंधन आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र भुजल अधिनियम २००९ मध्ये काही सुधारणा करुन नागरिकांनी त्यावर सूचना किंवा आक्षेप द्यावेत, असे २५ जुलैच्या अधिसूचनेत म्हटले आहे. राज्य शासनाचे २५ जुलैला प्रसिद्ध केलेल्या अधिसुचनेतील काही कलमे शेतकऱ्यांवर व सामान्य जनतेवर अन्याय करणारे आहेत. या अधिसुचनेतील कलमानुसार विंधन विहिरी खोदल्यावर बंधन येणार आहे. मात्र त्याला परवानगीसाठी लागणारी प्रक्रिया फारच किचकट आहे. तर दंडाची प्रक्रिया नागरिकांना अडचणीत आणणारी आहे. विद्यमान विहिरीची नोंदणी, पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीसाठी परवानगी, अधिसूचित क्षेत्रात जास्त पाणी लागणाºया पिकांची लागवडीसाठी परवानगी, यासारखे नियम असल्याचे कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे या अधिनियमाचा मसुदा भूजल सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त करुन त्यावर ग्रा.पं.मध्ये चर्चा करुन अन्यायकारक कलमावर आक्षेप नोंदविण्याची मागणी केली जात आहे.