मुंबई, पुण्यावरुन आलेल्यांनी वाढविली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:00:43+5:30

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ८५७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १ स्वॅब नमुना कोरोना बाधीत आढळला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४९ वर पोहचला आहे. यात ४८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर एक रुग्ण आधीच कोरोना मुक्त झाला आहे.

Concerns raised by those from Mumbai, Pune | मुंबई, पुण्यावरुन आलेल्यांनी वाढविली चिंता

मुंबई, पुण्यावरुन आलेल्यांनी वाढविली चिंता

Next
ठळक मुद्देमंगळवारी पुन्हा एका रुग्णाची भर : आकडा पोहचला ४८

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणारे स्थलांतरित मजूर आणि नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा ग्राफ दररोज वाढत आहे. मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधीत रुग्णाची वाढ झाली.त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४८ वर पोहचला आहे. तर मुंबई, पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्हावासीयांची चिंता वाढविली आहे.
शासनाने स्थलांतरित मजूर आणि विविध जिल्हा व राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यानंतर जिल्हात मुंबई, पुणे या रेड झोन क्षेत्रातून आलेल्या मजुरांमुळे कोरोना मुक्त असलेल्या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे तब्बल एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल २७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढच होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.२५) जिल्ह्यात चार कोरोना बाधीत रुग्ण आढळले होते, त्यानंतर मंगळवारी पुन्हा एक कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा ४८ वर पोहचला आहे. हे सर्व कोरोना बाधीत रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हाटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन सुध्दा गोंधळल्याचे चित्र आहे. कोरोना बाधीत रुग्णांचा ग्राफ वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढल्याचे चित्र आहे.

१७९ नमुुन्यांचा अहवाल अप्राप्त
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यातून एकूण ८५७ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात १ स्वॅब नमुना कोरोना बाधीत आढळला असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आता ४९ वर पोहचला आहे. यात ४८ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण तर एक रुग्ण आधीच कोरोना मुक्त झाला आहे. तर १७९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप नागपूर येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

जिल्ह्यात एकूण १३ कंटेनमेंट झोन
सात तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून व संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ कंटेनमेंट झोन घोषीत केले आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरुणनगर, करांडली, बराडटोली, सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार, सलईटोला, गोंदिया तालुक्यातील कटंगी, परसवाडा, नवरगाव कला, गोरेगाव तालुक्यातील गणखैरा, आंबेटोला, तिरोडा तालुक्यातील तिरोडा नगर आणि सालेकसा तालुक्यातील धनसुवा या क्षेत्राचा समावेश आहे.

Web Title: Concerns raised by those from Mumbai, Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.