गोंदियाला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 11:52 PM2019-08-02T23:52:07+5:302019-08-02T23:52:29+5:30

शहरातील पेयजल पूर्ती योजना असो की उड्डाणपूल. बायपास मार्ग असो की पार्कींग प्लाजा शहराला अधिकाधिक सुविधायुक्त बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.त्यात आता रेलटोलीत नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्यात आले आहे.

The concept of making Gondia a 'smart city' | गोंदियाला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा संकल्प

गोंदियाला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा संकल्प

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : मामा चौक-नागराज चौक रस्ता बांधकामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील पेयजल पूर्ती योजना असो की उड्डाणपूल. बायपास मार्ग असो की पार्कींग प्लाजा शहराला अधिकाधिक सुविधायुक्त बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.त्यात आता रेलटोलीत नाट्यगृहाचे बांधकाम अंतिम टप्यात आले आहे. यासाठी आम्ही नगर परिषदेची जागा किंवा त्यांचा निधी खर्च केला नसून निधी व जमीन शासनाकडून उपलब्ध करुन दिली आहे. गोंदिया शहराला‘स्मार्ट सिटी’ बनविण्याचा आम्ही संकल्प घेतल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
शहरातील मामा चौक ते नागराज चौक रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरण बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले,शहराला मुख्य शिक्षण केंद्राच्या रूपात विकसीत करण्यासाठी शासकीय मेडीकल कॉलेज, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे.आरोग्य सेवेसाठी केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयांची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. शहरात कमी वीज दाबामुळे सायंकाळी घरातील दिवे पथदिवे लागत नव्हते. यासाठी चार वीज उपकेंद्र तयार करण्यात आले असून आता कमी विद्युत दाबाची समस्या मार्गी लागली आहे. याशिवाय कित्येक अशी कामे आहेत जी प्रत्यक्षात दिसत नसली तरीही त्यांना पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहत असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाला कॉँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, शकील मंसूरी, सविता मुदलीयार, नानू मुदलीयार, सतीश देशमुख, राकेश ठाकुर, आलोक मोहंती, नफीस सिद्धीकी, चेतना पराते, गौरव वंजारी, डॉ. दीपक बहेकार, डॉ. पुष्पराज गिरी, डॉ.रोशन कानतोडे, डॉ.सुधीर कार्लेकर, लिंबाजी येळे, सिनू राव, जगदीश वासनिक, राजू गिºहे, सतीश राऊत, दिलीप काळे, त्रिलोक तुरकर, गणेश जाधव, प्रदीप ठवरे, विनय मिश्रा, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, बी.के.पटले, शिवराज भांडारकर, चंदू मेश्राम, बी. एल.गोस्वामी उपस्थित होते.

Web Title: The concept of making Gondia a 'smart city'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.