शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

१२०० हेक्टरमधील नुकसानीचे पंचनामे पूर्ण; अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:07 IST

Gondia : पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील दहा-बारा दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, तिरोडा, सालेकसा तालुक्यातील धानपिक, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले. यानंतर कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, शनिवारपर्यंत १२०० हेक्टरमधील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजित अडसुळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

जुलैत महिन्यात सलग बारा दिवस पाऊस झाला. काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो हेक्टर शेती पाण्याखाली होती. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची केलेली रोवणी वाहून गेली. तर काही शेतकऱ्यांचे पन्हे आणि धान सडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले होते.

कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात ३ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले होते. दरम्यान, कृषी विभागाने नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत १२०० हेक्टरमधील नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत असल्याने नुकसानीचे पंचनामे करताना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचण जात आहे.

नुकसानीचा आकडा पाच हजार हेक्टरवर जाण्याची शक्यताजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातच मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नुकसानीचा आकडा पाच हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

शेतकरी म्हणतात आता पुरेसा झाला पाऊसजिल्ह्यात दोन दिवस वगळता सलग पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने धान पिकांवर कीड रोगाची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून, आता पाऊस पुरेसा झाल्याचे सांगत आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाfarmingशेतीfloodपूर