शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

शासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:22 PM

ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देएकाच लाभार्थीला अनेकदा घरकुलाचा लाभ: सुपुत्राने केली दस्ताऐवजात खोडतोड

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे यासंदर्भात दैनिक लोकमतने अबब! एकाच व्यक्तीला चारदा घरकुलाचा लाभ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाला जागे केले होते.येरंडी देवलगाव येथील शांता भिवा वाघाडे या महिलेने अनेकदा शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला. या महिलेचा सुपुत्र विलास हा येरंडी ग्रा.पं.मध्ये परिचर आहे. सदर महिलेला २००४-०५ या वर्षात इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले. प्रथम झालेल्या बांधकामानुसार मुल्यांकन करुन त्यांना हप्ते अदा केल्याची नोंद शासकीय रोकडवहीत आहे. याच महिलेला परत २०११-१२ मध्ये याच योजनेचा लाभ देण्यात आला आहे. २०१५-१६ यार्वी सुद्धा इतर मागास प्रवर्गातून घरकुल मंजूर झाले होते. परंतु जाती विषयक दस्तावेज सादर न केल्यामुळे अनुदान वितरण करण्यात आले नाही. ही महिला अनु.जाती प्रवर्गाची असताना तिच्या कोणत्याही दस्ताऐवजांची शहानिशा न करता इतर मागास प्रवर्गातून प्रस्ताव मंजुरीसाठी गोंदियाच्या प्रकल्प संंचालकाकडे कसा पाठविण्यात आला होता. व तो प्रस्ताव मंजूर सुद्धा कसा झाला हे एक कोडेच आहे.सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाच्या जनरेटेड प्रायोरिटी यादीमध्ये कच्चे घर म्हणून नमूद असल्याने परत पुन्हा २०१६-१७ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांना अनेक घरकुल योजनांचा लाभ पोहोचविणामध्ये तिच्या सुपुत्राचाही तेवढाच सहभाग आहे. मालमत्ता रजिस्टर वारंवार घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पक्के घराऐवजी मातीचे घर अशी मालमत्ता रजिस्टर नमूना ८ मध्ये खोडतोड करण्याचा प्रकार या महिलेच्या सुपुत्राने केला. अशाप्रकारे या मायलेकांनी शासनाची फसवणूक केली. या संबंधाने येरंडी येथील प्रशांत तागडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेवून याप्रकरणी तक्रार केली होती.अखेर याप्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायाप्रसाद रामजी जमईवार यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. यावरुन नवेगावबांध पोलिसांनी आरोपी मायलेकांविरुद्ध ४२०, ४६६, ४६८, ४७१, ३४ भादंविचा गुन्हा नोंदविला आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजना