गोंदिया : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग जि.प.व प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर यांच्या वतीने आंगणवाडी क्र-२ कुडवा येथे जागतीक पोषाहार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली व विजेता बालकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याकरिता शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये गावपातळीवर व्हीसीडीसीए ग्रामीण रुग्णालय स्तरावर सीटीसी व जिल्हास्तरावर एनआरसी हे उपक्रम राबविल्या जातात.दि. १ ते ७ सप्टेंबर पोषाहार सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. याचा सप्ताहाचा पाठपुरावा म्हणून कुडवा येथील अंगणवाडी येथे जागतीक पोषाहार दिन का कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यामध्ये अंगणवाडीतील ० ते ५ वर्षातील बालकांना त्याच्या पालकांसोबत उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली व विजेता बालकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये जवळपास ४० माता व ६२ बालक उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, जिल्हा नियमन समन्वयक डॉ. सतेंद्र शुक्ला, आर.के.एस समन्वयक सुशील बन्सोड, अल्का मिश्रा उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. त्रिपाठी उपस्थित होते.डॉ. चौरागडे यांनी उपस्थित माता यांना बालकांचा मानसिक, बौद्धीक व शारीरिक दृष्टीने विकास कशा प्रकारे करता येईल या करीता पोषाहार कसा असावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. दैनिक आहारामध्ये समावेश कसा असावा तसेच वैयक्तीक स्वच्छता ही बालकांना शिकवावे जेणेकरुन बालकांचे मानसिक बौद्धीक व शारीरिक दृष्टीने विकास होईल. समुदवृद्धी हा आलेखानुसार हिरव्या रेषेत येईल आणि आपण कुपोषणमुक्त होणाच्या मार्गाने जाण्याकरीता मदद होईल असे मार्गदर्शन करण्यात आले.
कुडवा येथे रंगली सुदृढ बालकांची स्पर्धा
By admin | Updated: September 17, 2014 23:56 IST