दिलासादायक! गोंदिया जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 07:00 AM2020-10-27T07:00:00+5:302020-10-27T07:00:10+5:30

Corona Gondia News मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावत आहे. गोंदिया जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

Comfortable! On the way back to Corona from Gondia district | दिलासादायक! गोंदिया जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर

दिलासादायक! गोंदिया जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर

Next
ठळक मुद्देरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्केरुग्ण संख्येत होतेय घट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन महिने कोरोना बाधित रुग्णांचा आलेख सातत्याने उंचावित असल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७ हजाराच्या पार झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावत आहे. जिल्ह्यातून कोरोना परतीच्या मार्गावर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

जिल्ह्यात सोमवारी (दि.२६) ३८ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ११२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. सोमवारी सर्वाधिक १७ कोरोना बाधितांची नोंद गोंदिया तालुक्यात झाली आहे. सालेकसा ५, देवरी ३, सडक अजुर्नी ३, अजुर्नी मोरगाव ९ बाहेरील १ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९३४२ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ८३५४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात ९४२ कोरोना ?क्टीव्ह रुग्ण असून ८४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ३७२३८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी २८ हजार २४४ नमुने निगेटिव्ह आले आहे. तर कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ३०४०३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ३४२७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. तर त्यातुलनेत रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने कोरोना जिल्ह्यातून परतीच्या मार्गावर असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

८७.११ टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेतंर्गत १४ लाख ११ हजार ४२५ लोकसंख्येची आरोग्य तपासणीची पहिली फेरी पूर्ण झाली. १६ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या दुस?्या फेरीत आतापर्यंत १२ लाख २४ हजार ४९७ नागरीकांची तपासणी करण्यात आली. हे प्रमाण ८७.११ टक्के आहे. या मोहिमेत ७८७ आजारी रुग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात असता २६ रुग्ण बाधित आढळले आहे.

वॉर रुममधूृन २४ तास सेवा
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आणि बाधित रुग्णांना वेळीच उपचार मिळावा यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर वॉर रुम तयार करण्यात आली. यामाध्यमातून रुग्णांना २४ तास सेवा दिली जात आहे.

Web Title: Comfortable! On the way back to Corona from Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.