शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

स्वच्छताग्रहातून गावकऱ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:07 IST

महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रह आंदोलनाची प्रेरणा घेवून अदानी फाऊंडेशनने २०१५ मध्ये स्वच्छाग्रह उपक्रमाची सुरूवात केली. हाच उपक्रम आता फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यात स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे.

ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा उपक्रम : गावकऱ्यांमध्ये जनजागृती, २५० शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रह आंदोलनाची प्रेरणा घेवून अदानी फाऊंडेशनने २०१५ मध्ये स्वच्छाग्रह उपक्रमाची सुरूवात केली. हाच उपक्रम आता फाऊंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यात राबविला जात आहे. या उपक्रमातून गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प केला जात आहे. त्यामुळे तिरोडा तालुक्यात स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे.स्वच्छाग्रह अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५० हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे. या अभियानातंर्गत गावात गावात जाऊन गावकºयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच फाऊंडेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी सुध्दा गावात स्वच्छता अभियान राबवित आहे. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन अभियनाविषयी माहिती दिली. या वेळी गटशिक्षणाधिकारी एल.एल.मोहबंशी, पी.पी.समरीत, बालकृष्ण बिसेन, अदानी स्टेशन हेड सी.पी.साहू, समीर मिश्रा, नितीन शिराळकर उपस्थित होते. या वेळी अहमदाबाद येथील अदानी फाऊंडेशन स्वच्छाग्रह कार्यक्रमाचे प्रमुख जिग्नेश विभांडीक प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान त्यांनी स्वच्छाग्रह उपक्रमावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत अदानी फाऊंडेशनच्या सभागृहात प्राचार्य व शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळेला मार्गदर्शन करताना हरिखेडे म्हणाले, स्वच्छाग्रह अभियान हे स्वच्छ भारत अभियानाशी पूर्णपणे जुळले आहे. भारताच्या आगामी पिढ्यांमध्ये स्वच्छतेची एक संस्कृृृृृती निर्माण करणे ही या प्रकल्पाची संकल्पना आहे. स्वच्छाग्रह पूर्णपणे झाल्यानंतर प्रकल्पाचा प्रभाव पाहता येईल.स्वच्छाग्रह एक महत्वपूर्ण अभियान असून या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. ज्या लोकांमध्ये स्वच्छतेची सवय नाही, अशांच्या सवयीत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामाध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.दीड लाख विद्यार्थ्यांचा सहभागअदानी फाऊंडेशनतर्फे १७ राज्यात स्वच्छतेची संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून ३ हजार ७५ शाळांमध्ये पोहोचविण्यात यश आले आहे. ५७ हजारपेक्षा जास्त स्वच्छाग्रह आणि ३ हजार २०० स्वच्छाग्रह प्रेरक दरमहा १ लाख ५० हजार विद्यार्थ्यांपर्यत पोहोचली आहे.वेस्ट मॅनेजमेंटअदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम चार प्रमुख विषयांवर केंद्रीत आहे. वेस्ट मॅनेजमेंट आणि कचरा, स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता आणि शौचालय या विषयांना घेवून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात जात आहे.