शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थ्यांनो ऐनवेळी धावपळ नको असेल तर आजच करा 'कास्ट व्हॅलिडिटी'साठी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:15 IST

नेमकी कोणती कागदपत्रे जोडण्याची आहे गरज : जातवैधता प्रमाणपत्र महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून, पुढील शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातील कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातवैधता प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) अनिवार्य आहे. त्यामुळे पालकांनी वेळेत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय किंवा पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. बारावीनंतर वैद्यकीय, दंतवैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतही हे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बहुतांश बहुतारा विद्यार्थी बारावीत असताना शाळेमार्फत जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करतात. त्यामुळे त्यांचा अर्ज प्रक्रियेत आहे की नाही आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे का? याची पालकांनी पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

नेमकी कोणती कागदपत्रे जोडण्याची आहे गरज

  • महाविद्यालयाचे शिफारस पत्र
  • १६ 'अ' फॉर्मवर प्राचार्यांची सही आणि शिक्का
  • चालू वर्षाचे बोनाफाइड प्रमाणपत्र
  • जातीविषयक सर्व पुरावे आणि विहित नमुन्यातील शपथपत्र
  • सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज कोठे करणार?

  • विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशींसह सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
  • बहुतांश विद्यार्थी ११ वी किंवा १२ वीमध्ये असताना शाळेमार्फत अर्ज सादर करतात. मात्र, काही विद्यार्थी याकडे दुर्लक्ष करतात. अशा विद्यार्थ्यांनी आता सतर्क व्हावे.

पालकांनो, याकडे लक्ष द्या !

  • जातवैधता प्रमाणपत्राशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
  • शाळा किंवा महाविद्यालयामार्फत अर्ज सादर केला आहे का? याची पालकांनी खातरजमा करावी.
  • उशिरा अर्ज केल्यास प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, त्यामुळे 3 वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
टॅग्स :gondiya-acगोंदिया