शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

७७ गावांची भूजल पातळी वाढल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर ...

ठळक मुद्देकृषी विभाग : संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून अनियमित पाऊस पडत आहे. परिणामीे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र यानंतरही कृषी विभागाने सन २०१६-१७ या कालावधीत ७७ गावे वॉटर न्यूट्रल व भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे. त्यामुळे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात केली.या अभियानातंर्गत २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये जलयुक्त शिवारची विविध कामे करण्यात आली. यामुळे ही गावे वॉटर न्युट्रल झाली असून या गावांमधील भूजल पातळीत सुध्दा अर्धा ते एक मीटरने वाढ झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ७७ गावे वॉटर न्युट्रल झाली आहेत. यात आमगाव तालुक्यातील ९ गावे, सडक-अर्जुनी १०, देवरी ११, सालेकसा ८, तिरोडा ९, गोरेगाव ११, गोंदिया १० व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ९ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी साठ्याची क्षमता २०५४२.०६ टीसीएम आहे. तर प्रत्यक्ष निर्माण झालेला पाणीसाठा २०६९६.८८ टीसीएम आहे. त्यामुळे १४ हजार ४६५ हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ च्या प्रगती अहवालानुसार, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुधारित प्रस्तावित कामांची संख्या २७६३ होती. २७५९ कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. तर सर्व योजना मिळून २७५२ कामांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. २७४९ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात २६२३ कामे सुरू करून २६१९ कामे पूर्ण करण्यात आली. चार कामे प्रगतीपथावर आहे.

टॅग्स :Waterपाणी