शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

वरातीत मुलाच्या मद्यपी मामाने घुसवली कार; मुलीचे काका ठार, ३ गंभीर

By नरेश रहिले | Updated: December 16, 2023 18:45 IST

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगी येथील एका लॉन मध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी लग्न समारंभ असल्याने लग्नात वऱ्हाडी जमले होते.

गोंदिया : लग्न सोहळ्याची धामधूम सुरू असतांना सगळीकडे लगबग सुरू होती. नवरदेवचाी वरात काही वेळातच लग्न मंडपी पोहचणार असल्याने सर्वांनी एकच गर्दी केली होती. परंतु या भर वरातीत मद्यप्राशन केलेल्या नवरदेवाच्या मामाने चक्क वरातीत भरधाव वेगात कार घातली. यात मुलीच्या मामाचा मृत्यू तर तीन वऱ्हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना १५ डिसेंबरच्या सायंकाळी ७:३० वाजता घडली. आत विनोद छगनलाल लिल्हारे (३२) रा. कटंगटोला (नागरा) ता. गोंदिया यांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर असल्याने त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कटंगी येथील एका लॉन मध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी लग्न समारंभ असल्याने लग्नात वऱ्हाडी जमले होते. वराकडीलु मंडळी नाचत-गाजत वरात लग्न मंडीप घेऊन येत असतांना अवघ्या काही अंतरावर वरात होती. याचवेळी दारू ढोसून आलेल्या एमपी ५० ०४२१-२३१५ च्या कार चालकाने आपली कार चक्क वरातीवरच चढविली. यात विनोद लिल्हारे आणि इतर तीन असे चौघे गंभीर जखमी झाले. विनोद लिल्हारे यांचा पाय तुटला. त्या चौघांना गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात नेले. मात्र तिथून विनोद यांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे नेताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. लग्नाच्या शहनाईचा सूर क्षणार्धात मातंम च्या सूरांत पसरला. शांततेने त्वरीत लग्न सोहळा आटोपून संगीताविना लग्नसोहळा पार पडला. या घटनेसंदर्भात कार चालक अरविंद दिलिप देशमुख (५२) रा. जि. प. शाळेसमोर गोरेगाव ह.मु. रोहीतनगर एक्सटर्नल कॉलेजजवळ भोपाल ता. जि. भोपाल (मध्यप्रदेश) याच्याविरूध्द रामनगर पोलिसांनी महेश बालीराम सिल्वारे (३६) रा. चांदणीटोला यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कार चालकाला बदडलेभर वरातीत वऱ्हाड्यांवर कार चढविणाऱ्या अरविंद दिलिप देशमुख (५२) रा. जि. प. शाळेसमोर गोरेगाव ह.मु. रोहीतनगर एक्सटर्नल कॉलेजजवळ भोपाल ता. जि. भोपाल (मध्यप्रदेश) याला वऱ्हाड्यांनी बेदम मारहाण केली. कारच्या काचा फोडल्या. कार चालकाला शिवगाळ करून लोकांनी मारहाण करीत काही काळ गोंधळ उडविला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाDeathमृत्यू