दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : गोरेगाव-गोंदिया रस्त्याची बिकट परिस्थिती पाहिल्यावर या रस्त्याच्या कामाविषयी कुण्याही लोकप्रतिनिधींना काही घेणे देणे आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. ठिकठिकाणी पडलेले खड्डे चिखल, वाहन चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सोमवारी गणेश विसर्जनासाठी या रस्त्यावरुन जात असलेल्या देवदर्शनाच्या देखाव्याचे रथ फसले. त्यामुळे या मार्गाच्या दुर्दशेचा फटका देवला ही बसल्याचा अनुभव आला. रस्त्याच्या देवालाही फटका बसावा यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असावे, अशीच प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.गोरेगाव-गोंदिया मार्गावरुन भाजप सरकारने अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रा याच रस्त्यावरुन गोंदियावरुन गोरेगावला आली होती. महाजनादेश यात्रा येणार म्हणून कंत्राटदाराने सर्व खड्डे बुजविले नव्याने तयार करण्यात आलेला चार-पाच फुटाचा रस्ता तात्पुरता सुरु केला. एखादा लोकप्रतिनिधी येत असेल तर चांगले रस्ते तयार करायचे मात्र सामान्य नागरिकांसाठी ठिकठिकाणी पडलेले खड्डेही न बुझविणे म्हणजे सर्वसामान्य जनतेची कुठलीच कदर केली जात नाही, असे म्हणणे आतिशयोक्ती ठरु नये. सर्वसामान्यांना त्रास होऊ नये त्यांना चांगले दर्जेदार रस्ते व मुलभूत गरजा मिळाव्या असे शासनाचे धोरण आहे. मात्र दर्जेदार रस्ते अथवा मुलभूत सुविधा देतांना त्याला कालमर्यादाही महत्त्वाची ठरते.गोरेगाव-गोंदिया राज्य मार्गाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. कधी धूळ तर कधी चिखलाचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या ह्या अडचणी फार मोठ्या आहे पण याकडे कुणाचे फारसे लक्ष नाही.लोकमतने यासंदर्भात वृत्तमालिका सुरु केल्यावर अनेक मान्यवरांचे दूरध्वनी लोकमत कार्यालयात आले. एकच वाक्य सर्वांच्या मुखातून बाहेर आले ‘साहेब बस्स, प्रश्न सुटे पर्यंत लिहा. लोकमतने सामाजिक बांधीलकी जपत नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याचा प्रश्न हाती घेतला.गेल्या एक वर्षापासून रस्त्याचे काम का पूर्ण होत नाही. मागील तीन दिवसांपासून लोकमतने हा मुद्दा लावून धरल्याने अनेकांनी लोकमतचे धन्यवाद मानले.श्वसनासह डोळ्याचे आजारदुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. कित्येकांना डोळ्याचे व श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. कुठल्याही एका बाजूने संपूर्ण रस्ता तयार करणे गरजेचे होते, जेणेकरुन एका बाजूने वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध झाला असता.
देवाचे रथ ही फसले रस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST
गोरेगाव-गोंदिया मार्गावरुन भाजप सरकारने अच्छे दिनाचे कौतुक सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. सदर यात्रा याच रस्त्यावरुन गोंदियावरुन गोरेगावला आली होती. महाजनादेश यात्रा येणार म्हणून कंत्राटदाराने सर्व खड्डे बुजविले नव्याने तयार करण्यात आलेला चार-पाच फुटाचा रस्ता तात्पुरता सुरु केला.
देवाचे रथ ही फसले रस्त्यात
ठळक मुद्देगोरेगाव-गोंदिया मार्गाची दुरवस्था : कंत्राटदाराचे दुर्लक्ष, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मौन