लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या एका शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना शनिवार (दि. १५) घडली. शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना देवरी येथे घडली. या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर हा मागील काही वर्षापासून देवरी एका विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
या शिक्षकाने शाळेतीलच एका शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला दोन हजार रुपये देतो. मला एक चुंबन दे, अशा प्रकारचे लज्जासपद कृत्य करून तिचा विनयभंग केला. याविषयीची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध देवरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. देवरी पोलिसांनी अपराध क्रमांक ५३/२५ भारतीय न्याय संहिता ७५(२) ७९ या कलमांतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गीता मुळे या करीत आहेत. या संतापजनक प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
"शाळेत कार्यरत असलेले शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे अजूनपर्यंत पोलिस स्टेशनकडून आम्हाला कळविण्यात आले नसल्याने आम्ही त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही. गुन्हा दाखल झाल्याची सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच शिक्षकावर कारवाई करण्याचा प्रस्ताव संस्था चालकाकडे पाठवू."-जी. एम. मेश्राम, प्राचार्य, देवरी