मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन ...

Carefully plan your pre-monsoon preparations | मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करा

googlenewsNext
ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मान्सून कालावधीत अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी मान्सूनपूर्व तयारीचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.१५) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. बलकवडे यांनी १ जूनपासून मान्सूनचा कालावधी सुरू होणार आहे. सर्व विभागांनी नैसर्गीक आपत्तीचे पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ८७ गावांमध्ये पूर परिस्थितीचे संभाव्य धोके आहेत. त्यामुळे मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाययोजना करण्यासंबंधी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धान्य, औषध साठा, आरोग्य पथक, पूर परिस्थितीची सूचना, जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध असल्यास नैसर्गीक आपत्तीला तोंड देण्यास सोयीस्कर होईल असे त्यांनी सांगीतले. तसेच नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात असलेल्या नाले, नाली सफाईचे काम करण्याच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या. पावसाळ््यात जलजन्य व किटकजन्य आजारांची साथ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरेसा साठा उपलब्ध करु न ठेवावा. तालुकानिहाय गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या तयार कराव्यात.
पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोज सकाळी ८ वाजतापर्यंत अद्ययावत करुन जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. सभेला सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषद - नगरपंचायत मुख्याधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सभेत विषयांचे सादरीकरण आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

Web Title: Carefully plan your pre-monsoon preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.