शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण्याची तरतूद केली आहे. मात्र अशा पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याची जाचक अट घालून वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने धोरण निश्चित केल्यामुळे शासनाप्रती शिक्षकांच्या मनात रोष आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना बारा वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि चोवीस वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याकरिता शासनाने पात्र शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट घालून आर्थिक लाभापासून पात्र शिक्षकांना वंचित ठेवले आहे. सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट रद्द करून पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ देण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण्याची तरतूद केली आहे. मात्र अशा पात्र शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याची जाचक अट घालून वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने धोरण निश्चित केल्यामुळे शासनाप्रती शिक्षकांच्या मनात रोष आहे. जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे सेवांतर्गत प्रशिक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी अद्यापही पात्र शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन केले नाही.

शिक्षकांना धरले जात आहे वेठीस - नुकतीच सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची लिंक तयार करून ऑफलाईन प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपये प्रति शिक्षकाकडून घेतले जात असल्याची ओरड आहे. वास्तविक यापूर्वी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते. सेवा कालावधीत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून देण्याच्या वचन चिठ्ठीवर पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा लाभ देण्यात येत होता हे विशेष. परंतु आता शासनाने वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रदान करण्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची जाचक अट निर्माण करून पात्र शिक्षकांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवून वेठीस धरले जात आहे. 

विनाकारण भुर्दंड कशाला- वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड श्रेणी लाभासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची शिक्षकांच्या अध्यापन कार्यात कोणतीही गरज नसताना सेवांतर्गत प्रशिक्षणाची आवश्यकता करणे म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा खर्च वाढविणे असे आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक