प्रचारात भाजपा-सेनेचे एकला चलो रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:28 PM2019-03-30T23:28:42+5:302019-03-30T23:29:13+5:30

राज्यात भाजप-सेना युती होण्यावर निवडणुका घोषीत होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर नाही हो म्हणता म्हणता भाजपा-सेनेची युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले.

In the campaign BJP-Sena's singles ray | प्रचारात भाजपा-सेनेचे एकला चलो रे

प्रचारात भाजपा-सेनेचे एकला चलो रे

googlenewsNext
ठळक मुद्देस्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव : युतीधर्म केवळ नावापुरताच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यात भाजप-सेना युती होण्यावर निवडणुका घोषीत होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर नाही हो म्हणता म्हणता भाजपा-सेनेची युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पातळीवरील मनभेद दूर झाले असले तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील मतभेद दूर न झाल्याने दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही समन्वय झाले नसल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांची साथ न घेता एकला चलो रे म्हणत उमेदवाराच्या प्रचाराला सुरूवात केल्याचे चित्र गोंदिया-भंडारा लोकसभा मतदार संघात पाहयला मिळत आहे.
गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १४ उमेदवार रिंगणात असून त्यांना चिन्ह वाटप सुध्दा झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार असून कमीत कमीत दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांनी दिवसरात्र एक केल्याचे चित्र आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १४ उमेदवार जरी असले तरी खरी लढत राष्टÑवादी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये होणार स्पष्ट आहे.युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या तर आघाडीत राष्टÑवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. मात्र युतीमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघावर आपला दावा केला त्यासाठीच उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उघडपणे उमेदवारीला विरोध करीत निवडणुकी दरम्यान प्रचारात सहभागी न होता घरी बसणार अशी भूमिका सुध्दा शिवसैनिकांनी घेतली होती. त्यामुळेच या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात सर्वच काही आॅलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. मातोश्रीवरुन आदेश झाल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचा धर्म म्हणून वैर बाजुला ठेवून युतीच्या उमेदवाराचा प्रचारात सक्रीयपणे सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक भाजपा नेते प्रचारा दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनासोबत घेत नसल्याचे चित्र आहे.
एवढेच नव्हे तर प्रचारासाठी वाहने, प्रचार साहित्य यांची सुध्दा गरज आहे का याची सुध्दा विचारणा करीत नसल्याची भावना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने व्यक्त केली. त्यामुळेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपाच्या निमंत्रणाची वाट न पाहता युतीधर्म म्हणून एकला चलो रे म्हणत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र प्रचारासाठी मतदारांमध्ये जातांना भाजपा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळे फिरत असल्याने मतदारांना सुध्दा खरोखरच युती झाली का असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या एकला चलो रे भूमिकेचा फटका युतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन विधानसभेसाठी सेनेचे सर्जिकल स्ट्राईक
भंडारा-गोंदिया लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला मिळावी यासाठी दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. तर दुसरीकडे युती झाली असताना सुध्दा भाजपाचे स्थानिक नेते शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना महत्त्व देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सहा महिन्यांनी होणाºया विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून गोंदिया व भंडारा विधानसभेत जनसंपर्क वाढविण्यास सुरूवात केली. या दोन्ही जागांची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून त्यादृष्टीने सेनेच्या पदाधिकाºयांनी सर्जीकल स्ट्राईक सुरू केले आहे.
उमेदवाराचीही अडचण
भाजपा-सेना युतीचा उमेदवार म्हणून भाजपाचा उमेदवार दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याला सोबत घेतले तर त्याला नाराजी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने उमेदवाराची चांगलीच अडचण होत आहे.

Web Title: In the campaign BJP-Sena's singles ray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा