तिरोडा : तालुक्यात अजूनही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धान खरेदी केंद्र सुरू आहेत. शेतकऱ्यांचे धान शेतातूनच स्वत:च्या ट्रॅक्टरने उचलण्याची सुविधा देऊन कमी किमतीत धान खरेदी केल्या जात आहे. याची माहिती कृउबासचे पदाधिकारी, अधिकारी यांना असतानाही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे.समितीच्या वतीने अवैध खरेदी केंद्रांना भेटी देऊन कार्यवाही करण्यात येत असल्याचा देखावा करण्यात येत आहे. परंतू कोणालाही दंडाची पावती दिली जात नाही. काही ठिकाणी शेष फंडाची पावती देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे धान खरेदी करणारे कृऊबासच्या वतीने जणूकाही ेपरवानाच मिळाला आहे, अशा अविर्भावात शेतकऱ्यांकडून धान खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे नंतर समितीतर्फेसुध्दा त्या व्यक्तिकडे पुन्हा फिरकून बघितल्या जात नाही. यात शेतकरी मात्र नाहक नागविल्या जात आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी होत आहे.
तिरोड्यात कमी भावात धान खरेदी
By admin | Updated: November 15, 2014 22:49 IST