शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

८८३२ क्विंटल धानाची खरेदी

By admin | Updated: October 29, 2016 01:03 IST

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पैसा यावा यासाठी गेल्या सोमवारपासून (दि.२४) सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी

६५ लाखांचे चुकारे : आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रांवर अल्प प्रतिसादगोंदिया : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पैसा यावा यासाठी गेल्या सोमवारपासून (दि.२४) सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रांवर पाच दिवसात ८८३२ क्विंटल धानाची आवक झाली आहे. १ कोटी ६० लाख रुपयांच्या या धानापैकी ६५ लाख रुपयांचे चुकारे झाले असून उर्वरित चुकारे मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांची गरज पाहून व्यापाऱ्यांकडून कमी भावात धान खरेदी केला जाऊ नये यासाठी दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. त्यामुळे सोमवारपासून (दि.२४) धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात यावर्षी एकूण ७९ केंद्रांवर शासनाच्या आधारभूत किमतीनुसार धान खरेदी होणार आहे. त्यात राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या ५६ केंद्रांपैकी गेल्या पाच दिवसात ४० केंद्र तर आदिवासी विकास महामंडळाच्या २३ केंद्रांपैकी १४ धान खरेदी केंद्र उघडण्यात आली आहेत. आत मार्केटिंग फेडरेशनने ८ हजार ६०४ क्विंटल धान खरेदी केले. त्याची किंमत १ कोटी २६ हजार ४८ हजार आहे. त्यापैकी ६५ लाखांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयात खरीप हंगाम ३१ मार्च २०१७ पर्यंत आणि रबी हंगाम १ मे २०१७ ते ३० जून २०१७ पर्यंत निर्धारीत केलेले धानाचे दर प्रतिक्विंटल ‘ए’ ग्रेड धानासाठी १५१० रुपये तर साधारण ग्रेडसाठी १४७० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)चिचगड येथे खरेदीचा शुभारंभचिचगड : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था चिचगड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी माजी आ.रामरतन राऊत, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगन वारई, उपाध्यक्ष विजय कश्यप, व्यवस्थापक मारोतराव खंडारे, माजी जि.प. अध्यक्ष प्रल्हाद भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शामराव गोविंदा शहारे या शेतकऱ्यांचे धान मोजून उद्घाटन करण्यात आले. दिवाळीपूर्वी धान खरेदी ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे.तेढ्यात केंद्र सुरूनिंबा(तेढा) : तेढा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटक तलाठी एल.एम.पराते तर अध्यक्षस्थानी पोलीस पाटील युवराज वाघमारे तसेच तानुटोला, पठाणटोला, हलबीटोला (तेढा), हलबीटोला (निंबा), तुमसर व चिचटोला येथील शेतकरी संस्थेचे सचिव एच.आर.भोयर व शिपाई पी.एम.राऊत उपस्थित होते.उद्घाटक पराते यांनी शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रात धान विक्री केल्याने कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली व जास्तीत या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. (वार्ताहर)-आज मिळणार चुकारेआदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. उघडलेल्या १४ केंद्रांपैकी १२ केंद्रांवर शुक्रवारपर्यंत जेमतेम २२८ क्विंटल धान आला होता. त्याची किंमत ३ लाख ३५ हजार २०४ रुपये आहे. चुकाऱ्यांसाठी बँकांची लिमिट मंजुर झाली असून शनिवारी बँका सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतील, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राजुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.महामंडळाच्या खरेदीसाठी सध्यातरी बारदाणा पुरेसा आहे. मात्र दिवाळीमुळे ३-४ दिवस खरेदी केंद्रांवर हमाल येत नाहीत. दिवाळीनंतर धान खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे.