सदरमध्ये ‘द बर्निंग कार'
By Admin | Updated: November 17, 2016 03:03 IST2016-11-17T03:03:33+5:302016-11-17T03:03:33+5:30
गॅरेजमधून कार दुरुस्त करून घेऊन जात असताना कारच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे भररस्त्यातच आग लागली.

सदरमध्ये ‘द बर्निंग कार'
सुदैवाने चालक बचावला
नागपूर : गॅरेजमधून कार दुरुस्त करून घेऊन जात असताना कारच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे भररस्त्यातच आग लागली. या आगीत स्कोडा कार संपूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता सदर पोलीस ठाणे हद्दीतील पूनम चेंबर चौकात घडली. बर्निंग कार बघण्यासाठी नागरिकांनी बरीच गर्दी केल्यामुळे काही वेळापर्यंत वाहतूक खोळंबली होती.
एका गॅरेजमध्ये अक्रम खान हे नवीन स्कोडा आॅक्टिवा कार घेऊन सदरमधील दुरुस्तीसाठी जात होते. आज बुधवारी दुपारी ३ वाजता कार दुरुस्त झाली. गॅरेजमधील मेकॅनिकने टेस्ट ड्राईव्हसाठी कार बाहेर काढली. मात्र, इंजिनमधील वायरिंगमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याने पूनम चेम्बर चौकात कारची गती कमी केली. दरम्यान कारच्या इंजिनमधून धूर निघताना दिसला. त्या चालकाने कारमधून उडी घेऊन पळ काढला. काही मिनिटाच्या अवधीत संपूर्ण कारने पेट घेतला. भररस्त्यात जळत असलेली कार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एकाने अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळावर पोहचून आगेवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कारमालकाचे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.(प्रतिनिधी)