शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बीएसएनएल कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 5:00 AM

  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमला नगर परिषद ...

ठळक मुद्दे५.५० लाखांची थकबाकी : कर वसुली पथकाची आगेकूच

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मालमत्ता कराची थकबाकी न भरल्याने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमला नगर परिषद मालमत्ता कर वसुली पथकाने कुलूप ठोकले होते. यामुळे शहरात खळबळ माजलेली असतानाच पथकाने मंगळवारी (दि.१५) थेट दूरसंचार निगमच्या (बीएसएनएल) सुभाष बागेच्या शेजारील कार्यालयालाच कुलूप ठोकले. त्यांच्यावर पाच लाख ५० हजार ७८२ रूपयांची थकबाकी आहे. वसुली पथक कधीही कुणावरही धडक देत कारवाई करीत असल्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.  नगर परिषदेला यंदा सुमारे ११ कोटी रूपयांच्या मालमत्ता कल वसुलीचे टार्गेट आहे. मात्र मालमत्ता धारकांकडून वसुली कर्मचाऱ्यांना टोलविण्यात येत असल्याने ही रक्कम वाढत आली आहे. यंदा मात्र हा प्रकार खपवून घ्यायचा नाही हे ठरवून घेत मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कायद्याचा आधार घेत मालमत्ता धारकांनी कर भरण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकारच कर वसुली पथकाला दिले आहे. यातूनच पथकाने सोमवारी (दि.१४) शहरातील एक्सीस बॅंकेच्या एटीएमलाच कुलूप ठोकले. मालमत्ताधारकाने कर न भरल्याने पथकाला ही कारवाई करावी लागली. तर बॅंक ऑफ बडोदा व इंडियन ओव्हरसीज बॅंकेला नोटीस बजावले आहे. त्यानंतर मंगळवारी (दि.१५) शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बागेच्या बाजूला असलेल्या बीएसएनएल कार्यालयावर धडक दिली. कार्यालयावर पाच लाख ५० हजार ७८२ रूपयांची थकबाकी असून त्यांनी ती रक्कम पथकाला दिली नाही. अशात पथकाने सर्वप्रथम त्यांच्या टॉवरचे पॉवर ऑफ केले होते. मात्र यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प झाले असते ही बाब लक्षात घेत मुख्याधिकारी चव्हाण यांनी पॉवर ऑप न करण्यास पथकाला सांगीतले. मात्र पथकाने बीएसएनएलच्या कार्यालयालाच कुलूप ठोकले. तर सोमवारी इडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएम एजंसीने दिलेल्या हमीपत्रानुसार एक लाख ५४ हजार रूपये पथकाकडे जमा केले. यामुळे इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या एटीएमवरील कारवाई टळली. 

आता शासकीय कार्यालय रडारवर पथकाने बीएसएनएल कार्यालयावर कारवाई करीत कुलूप ठोकल्याने एकच खळबळ माजली आहे. मात्र शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता कराच्या मोठ्या रकमा अडकून पडल्या आहेत. यामुळे नगर परिषदेच्या वसुलीच्या थकबाकीचा आकडा वर चढलेला आहे. आता या शासकीय कार्यालयांकडून ही रक्कम काढण्यासाठी पथक त्यांच्याकडे धडक देणार आहे. शहरातील बॅंका, एटीएम व आता शासकीय कार्यालय पथकाच्या रडारवर आहेत. सात लाख रूपयांची कर वसुली मंगळवारी पथकाने शहरातील काही व्यापाऱ्यांकडे ही मालमत्ता कर वसुलीसाठी धडक दिली. तर यापूर्वी धडक दिलेल्या व्यापाऱ्यांनीही त्यांच्याकडील थकबाकी जमा केली. अशात मंगळवारी पथकाने सात लाख चार हजार ५३३ रूपयांची वसुली केली आहे. यामध्ये दोन लाख ५२ हजार रूपयांची धनादेश असल्याची माहिती कर अधिकारी विशाल बनकर यांनी दिली.

टॅग्स :BSNLबीएसएनएल