शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दोघांचे प्रस्ताव अमान्य वर्षभरात सात जणांना केले स्थानबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:53 IST

Gondia : डेंजरस अॅक्टिव्हिटी करणाऱ्या ११ पैकी ९ जणांवर 'एमपीडीए'

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सराईत गुन्हेगारांना किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम.पी.डी.ए.ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. मागील दोन वर्षांत तब्बल नऊ जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. दोघांचे प्रस्ताव अमान्य करणाऱ्यात आले. यंदा तब्बल सात जणांवर एमपीडीएची कारवाई केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एम पी.डी.ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) करणाऱ्या आरोपींवर गोंदिया पोलिस प्रशासनातर्फे एम.पी.डी.ए. कारवाई केल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी, म्हणून पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई केली आहे. 

खून करणे, खोटे दस्तऐवज तयार करून ठगबाजी करणे, शासकीय कामकाजात उपयोगी येणारे नकली मोहरे बनविणे, चोरी करणे, अवैध उत्खनन करून रेती चोरी करणे, अवैधरीत्या गांजा बाळगणे, गांजा विक्री करणे, दरोडा घालणे, खंडणी मागणे, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे, अवैध शस्त्र पुरविणे, आदी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

यंदा यांच्यावर झाली एम.पी.डी.ए.ची कारवाईमनिष उर्फ जयराम धर्मराज सेवईवार (४५) रा. बलमाटोला रायपूर ता. गोंदिया (४ एप्रिल २०२४) आदेश अरविंद रामटेके (२२) रा. गिरोला (दासगाव) ता. गोंदिया (४ एप्रिल २०२४) अनमोल महादेव घोडीचोर (४०) रा. संत सज्जन वॉर्ड तिरोडा (१२ एप्रिल २०२४) धीरज प्रकाश बरियेकर (३६) रा. संत रविदास वॉर्ड (१२ एप्रिल २०२४) शुभम पुरुषोत्तम हरदीये (२५) रा. बाजपाई वॉर्ड गोंदिया (५ जुलै २०२४) सूरज प्रकाश बरियेकर (३६) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा (१९ सप्टेंबर २०२४) पंकज उर्फ मोनू गोविंद अग्रवाल (३६) रा. वसंतनगर गोंदिया (२६ सप्टेंबर २०२४)

सन २०२३ न्यायालयात पाठविले ४ प्रकरण दोन प्रकरणांत स्थानबद्ध ■ दोन प्रकरण अमान्य सन २०२४ न्यायालयात पाठविले ७ प्रकरण ७ प्रकरणांत स्थानबद्ध ०० अमान्य

"जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्त्तीवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली. यंदा सात जणांवर एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे." - गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया